Pandharpur

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना मनसेचा मदतीचा हात ; दिलीप धोत्रे

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना मनसेचा मदतीचा हात ; दिलीप धोत्रे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना व गरजवंतांना मनसेकडून मदतीचा हात देण्यात आला. सत्ताधारी व विरोधक केवळ बांधावर जाऊन घोषणा करतात. अशावेळी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शेतकऱ्यांना घरात जाऊन मदत करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.गेल्या काही दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची जीवित आणि वित्तहानी असे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त लोकांचे व त्यांच्या शेतीचे राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश झाले. तर विरोधकांकडून केवळ पाहणी झाली. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते दिलीप बाबू धोत्रे यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली. त्याप्रकारे त्यांना मदतही करण्यात आली.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ईरला गावात आलेल्या पुरामध्ये बालाजी वसंत कांबळे हे पाण्यात वाहून गेले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन लहान मुले व वृद्ध माता पिता आहेत. या संपूर्ण कुटुंबास उदरनिर्वाहासाठी धोत्रे यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली. तर भविष्यात या कुटुंबाची कुठलीही जबाबदारी घेण्यासाठी आपण सहयोग देऊ असे यावेळी आश्वस्त करण्यात आले. तर कळंब तालुक्यातील देवकी वसंत टिंगरे या महिलेचे संपूर्ण घर पावसात वाहून गेले. बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणचे जयश्री नरहरी ठोंबरे यांची बैल जोडी पुरात वाहून गेली. त्यामुळे एक प्रकारे टिंगरे आणि ठोंबरे या कुटुंबाची घडीच विस्कटून आर्थिक विवंचनेत सापडली. या दोन्ही कुटुंबाला धोत्रे यांनी आर्थिक मदत देऊ करीत. धीर देण्याचे काम केले. कळंब तालुक्यातील वडगाव येथील पंढरीनाथ राऊत शेतकऱ्याचे तीन एकर सोयाबीन पूर्णपणे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अल्पभूधारक शेतकरी असल्याने या शेतकऱ्याला दुसरा कुठलाही आर्थिक स्त्रोत नाही. त्यामुळे राऊत यांनादेखील आर्थिक मदतीचा हात मनसेच्या माध्यमातून दिलीप धोत्रे यांनी दिला.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारी पातळ्यांवर पंचनामे होतील. विरोधक व सत्ताधारी नेते बांधावर जाऊन पाहणी करतील. सरकारी मदत मिळायला दीर्घकाळ लोटेल. अशा स्थितीत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नव्हे तर त्याच्या घरात जाऊन कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांची सुखदुःखे वाटून घेत त्यांना मदत केली आहे. याप्रसंगी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन ,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे , जिल्हा संघटक अमरराजे कदम , बीड चे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, कल्याण केदार , शेतकरी सेनेचे भागवत शिंदे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट , सचिन दादा कांबळे , तालुकाध्यक्ष पाशा शेख , सलीम आवटी ,बाबासाहेब वाघमारे , दत्ता बोंदर ,भागवत शिंदे, रजनीकांत ढावरे ,विष्णू पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button