Nashik

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी ता येथे सह्याद्री देवराई  संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी ता येथे सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

सुनिल घुमरे नाशिक

: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेने सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वनीकरण कार्यक्रम सुरू असून याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मोहाडी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायतीच्या माळरानावर विविध वृक्षांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सह्याद्री देवराई चे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी अभिनेते सयाजी शिंदे यांनी तरुणांना व ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा दिली. तसेच मोहाडी येथील या प्रकल्पाचे गोपाल कृष्ण सह्याद्री देवराई असे नामकरण केले.

या प्रकल्पाला दरवर्षी वर्षातून एकदा स्वतः भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री देवराई चे महाराष्ट्र विभाग प्रमुख सचिन चंदने, शेखर गायकवाड, सचिन ब्राह्मणकर, रोहित झनझणे, योगेश पंदेरे, आदिती पाटील, कविता गुंजाळसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ग्रामस्थांनी आणलेल्या डब्यांचा सर्वांसमवेत पाहुणचार घेतला. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रकल्प यशस्वितेची ग्वाही दिली. याप्रसंगी स याद्री फार्म चे संचालक विलास अण्णा शिंदे कादवा संचालक शहाजी सोमवंशी, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, सुरेश कळमकर,
विलास पाटील, सरपंच राजाराम जाधव, उपसरपंच बाबासाहेब निकम, माध्यमिक मुख्याध्यापक म्हस्के, कैलास कळमकर, राजेंद्र कळमकर, लक्ष्मण देशमुख, शंकर ठाकूर,धनंजय वानले, ग्राम विकास अधिकारी सुधाकर जगताप उपस्थित होते. प्रकल्पाच्या समन्वयकाची जबाबदारी दत्ता जाधव, अजिंक्य सोमवंशी, सुदर्शन पाटील, चेतन लोखंडे, चेतन नेवकर, सौरभ जाधव यासह अनेक तरुणांनी घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button