Maharashtra

?️ दिलाचे Talk…जागर स्त्री शक्तीचा..

?️ दिलाचे Talk…जागर स्त्री शक्तीचा..

दसरा धम्म परिवर्तन दिन आणि विजया दशमी अगदी शांत रित्या पार पडला.भारत देशात सर्व दसरा हा सण अगदी उत्साहाने ने साजरा करतात.परंतु 2020 साल हे कोरोना या विषाणू ने गळफास संपूर्ण जगालाच लावलेला दिसतो.भारतात बेरोजगारी आगोदरच डोक वर काढून बसली होती. त्यात या कोरोनाचा लॉकडाऊन ! आर्थिक मंदिची लाट, महापूर ,पावसाचे थैमान ,कधी नाही ते मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला .शेतकरी त्रस्थ ,मजूरांची पायपीट ,शाळा बंद ,मंदीर बंद ,रेल्वे ,बसवाहतून सर्व बंद असा हा काळ ,त्या हळूहळू अनलॉक 1,2,3 सुरु आहे हळूहळू पुर्ववत दळणवळण सुरु होत आहे .अशा काळात सर्व लोक घरात आणि सण उत्सव दिवस साजरे करणारी भारतीय परंपरा काही माघे नाही .
त्याचाच एक भाग म्हणून *नऊ रात्र नऊ विचार सत्र* अनोखा उपक्रम सोशल मेडीया माध्यमाचा उपयोग करुन बहुजन साहित्यिक महिला मराठवाडा समुहाने सण ,अनोख्या पद्धतीने उत्साहाने साजरा केला .

नऊरात्र मधे अनेक महिलांच्या नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्याचे फॕड जरा जास्तच डोकावताना दिसत आहे .खर तर हा मार्केटींग फंडा आहे हे ओळखायला हवे .सजुन धजुन सण उत्सव साजरे करण्या पेक्षा विवेक जागृत ठेवून चांगल्या परिवर्तनवादी विचाराने उत्सव साजरे करायला हवेत.
असाच प्रयत्न बहुजन महिला साहित्यिक समुह ,मराठवाडा what app group द्वारे अॉन लाईन चर्चा सत्र आयोजित केले होते .नऊ रात्र नऊ विचार यांची माळ गुंफण्यात आली होती .या मधे अनेक बंधू भागिणी सामिल झाल्या होत्या ,या चर्चा सत्राचे संयोजन शिरोमणी , शिक्षकपेशातील असलेले ,अनिता जावळे -वाघमरे (लातूर) ,संगिता खोसे -भोसले(लातूर),प्रतिभा चव्हान (बीड),दिपाली बाभूळकल (अमरावती),चित्र लेखा जाधव (रायगड),मा.सुधिर कांबळे (उस्मानाबाद ),अॕडोकेट मा.भारती रोकडे (उस्मानाबाद), मा.आशा हानगुलक (लातूर ),रंजना चव्हाण (लातूर) या सर्वानी आपल्या परिवर्तनशील विचाराची माळ गुंफली .
नऊ दिवस नऊरात्र उत्सव निमित्त , वैचारिक जनजागृती दृष्टिकोन ठेऊन चर्चा सत्र आयोजित केली .
नऊ विषयावर चर्चा संपन्न झाली

1 स्त्रीवाद

2 संस्कृती आणि परंपरा यात महिलांची भुमिका

3 स्त्री शिक्षण आणि महिला चळवळ आपली भूमिका

4 बलात्कार एक विकृत मानसिकता

5 स्त्रीयांचे कायदेशिर हक्क

6 जाहिराती आणि इलेक्ट्रॉनी मेडीयाची महिला संदर्भात भुमिका

7 हिंदू संस्कृती आणि स्त्रीया

8 शृंगार आणि महिलांची बदलती भुमिका

9 भविष्यातील भारतीय महिला कशी असायला हवी.

या सर्व विषयावर विचार मंथन झाले ,अनेक बंधू भगिणी यात सामिल झाल्या होत्या .अनेकांचे विचार मांडण्यासाठी हा विचार मंच खुला होता ,भारतीय महिला ,साहित्यात महिला योगदान ,बदलत असलेली भारतीय स्त्री ,परंपरेच्या बेड्या झुगारणारी स्त्री ,स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून फूलणारी स्त्री. या चर्चा सत्रात दिसून आली ,हे सकारात्मक चित्र सृदृढ भारतीय नागरीक म्हणून फुलवण्याचे दृश्य नक्कीच दिसते आहे.

@अनिता जावळे-वाघमारे
मु.पो.मुरुड ता.जि.लातूर
9545050292
email [email protected]
[10/26, 10:31] anitajawale1977: नमस्कार ताई हा लेख ??

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button