India

अरे हि ब्लाऊज घालायला विसरली काय..!हटके फॅशन…व्हिडिओ व्हायरल..!

अरे हि ब्लाऊज घालायला विसरली काय..!हटके फॅशन…व्हिडिओ व्हायरल..!भारतातील सर्वात आवडता आणि पारंपरिक पोशाख म्हणजे साडी..भारतात साडी वेगवेगळ्या प्रकारे परिधान केली जाते.कितीही आधुनिकता आली तरी महिलेचं सौंदर्य हे साडीतच खुलत अस म्हणतात.साडी आणि तिच्या पेहरावात आधुनिकीकरणा मुळे जरी बदल होत असले तरी साडी ती साडीच असते..!आणि त्यात प्रत्येक महिला सुंदरच दिसते.आधुनिक काळात साडीवर आकर्षक डिझाइन असलेले वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज परिधान केले जातात.हल्ली मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा प्रिंटेड हेवी वर्क असलेले ब्लाऊज वापरण्याचा ट्रेंड आहे.आता ह्या फॅशन मध्ये नवीन एन्ट्री झाली आहे.सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झालेल्या ह्या व्हिडीओत महिला साडीवर ब्लाऊज घालायला विसरली की काय? पण तसे नसून या महिलेने ब्लाऊजऐवजी थेट मेहंदी काढली आहे.ह्या आगळ्यावेगळ्या ब्लाऊज फॅशनच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने साडीवर मेहंदीने काढलेलं ब्लाऊज आहे. पांढऱ्या रंगाची चिकनकारी साडीवर मॅचिंग ब्लाऊजऐवजी हिना ब्लाउज घातला होता. ब्लाऊजच्या आकारात अंगावर तिने आकर्षक मेहंदी डिझाइन काढलेली आहे. ही मेहंदी अगदी हुबेहुब ब्लाऊजसारखा आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टिका केल्या आहेत.तर काहींनी ब्लाऊज ची डिझाइन काढणाऱ्या मेहंदी कलाकाराचं कौतुक केलं आहे.
thanos_jatt नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button