Dhule

धुळेदुष्काळग्रस्त भागातील एसटी कर्मचारी भरती २०१९ मधील ३२०० कर्मचाऱ्यांची स्थगिती तात्काळ उठवणे व तात्काळ प्रशिक्षण सुरू करणे .

धुळेदुष्काळग्रस्त भागातील एसटी कर्मचारी भरती २०१९ मधील ३२०० कर्मचाऱ्यांची स्थगिती तात्काळ उठवणे व तात्काळ प्रशिक्षण सुरू करणे .

प्रतिनिधी /असद खाटीक

मागण्या :
१) २०१९ ला जाहिरात देऊन दुष्काळग्रस्त भागातील एसटी महामंडळात चालक व वाहकांची भरती केली होती. त्या ३२०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या नावाखाली स्थगिती करण्यात आली. तात्काळ शेतकऱ्यांच्या पोरांची दुष्काळग्रस्त भागातील ३२०० एसटी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची स्थगिती उठवावी. आता १००% बस सुरू झाल्यात त्यामुळे तात्काळ प्रशिक्षण सुरू करावे
२) परिवहन मंत्री अनिल परब यांनी काढलेल्या स्थगितीच्या जीआरमुळे मानसिक तणावात जाऊन विशाल हटवार(नागपुर चालक तथा वाहक प्रशिक्षणाथीॅ), व अमोल माळी(सांगली, मॅकनीक) या दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस महामंडळ जबाबदार असून ही हत्याचं आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ या दोन्ही शहिदाना रु. 25 लाखांची मदत तात्काळ देण्यात यावी व कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं.

३) अतिरिक्ततेच्या नावाखाली जवळपास 160 लिपिक कर्मचाऱ्यांची खंडित केलेली सेवा तात्काळ सुरू करावे व रुजू करावे. यात काही कर्मचारी अनुकंपधारक आहेत सर्वच मानसिक तणावात आहेत. 11 वर्ष नौकरी कलेल्याना खंडित करणे निंदनीय आहे. सर्वच 100% कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करावे व कोरोनाच्या काळात बदल्या थांबवाव्यात.
४) सर्वच एसटी कर्मचार्यांचे थकीत पगार तात्काळ देण्यात यावेत.

सदरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा येणाऱ्या ५ नाेहाेंबर ला आपल्या कार्यलयावर ऑल इंडिया पँथर सेना एसटी कामगार बचाव हल्लाबोल आंदोलन छेडणार आहे याची दखल घ्यावी सदरील निवेदन हे इशारा आहे याची दखल घ्यावी व कामगारांच्या अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला जाईल असा इशारा संघटना देत आहे याची दखल घ्या!
उपस्थित धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड.विलास जी भामरे तालुका स्संघटक भाऊसाहेब बलसाने धाकला भाऊ निकम सनी जाधव आकाश बाविस्कर संजय थोटे किरण धिवरे अशोक धिवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button