Bhadgaw

पावसामुळे गिरणा धरण पाणी साठ्यात वाढ ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा;उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना

पावसामुळे गिरणा धरण पाणी साठ्यात वाढ ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा;उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना

भडगाव :- गिरणा धरणाचा जिवंत पाणी साठी वाढला असून धरण साठ्यात सद्या ८५ % पाणी असून हा पाणीसाठी वाढता असल्याने परिसरासह नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या सातत्यपूर्ण पावसाने पाणी पातळीत वाढ होत आहे . आज दि ७ रोजी सद्यपरिस्थितीत धरणाचा जिवंत पाणी साठा ८५ % झाला आहे. धरणात येणारा पाणी प्रवाह कायम राहिल्यास धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही क्षणी गिरणा नदी पात्रात गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येईल . त्या दृष्टीने सावधगिरीचा इशारा म्हणून नदीकाठच्या गावांना मालमत्ता, घरे आदींना जीवित हानी होऊ नये म्हणून नदीकाठच्या लोकांना तात्काळ सवधतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत नदीकाठ काठच्या लोकांनी सतर्कता व सावधगिरी बाळगावी असे अशा सूचना आज दि ७ रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, नगर परिषद मुख्याधिकारी विकास नवाळे, पंचायत समिती, भडगाव पाचोरा यांना सूचना दिल्या आहेत . तर जळगाव गिरणा पाट बंधारे , जिल्हाधिकारी जळगाव सह आदींना याबाबत कळविण्यात आले आहे.

भडगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने नदी काठच्या गावांतील नागरिकांनी पाण्यात जाऊ नये, सतर्कता बाळगून सावध राहावे , पाण्यापासून दूर राहावे अशा विविध सूचना व दवंडी देऊन आवाहन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button