Dhule

धाराशिव साखर कारखाना युनिट ३ प्रथम पाच साखर पोत्याचे पुजन हमाल कामगारांच्या हस्ते करण्यात आले..

धाराशिव साखर कारखाना युनिट ३ प्रथम पाच साखर पोत्याचे पुजन हमाल कामगारांच्या हस्ते करण्यात आले..

प्रतिनिधी : रफीक आत्तार

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन बोलताना म्हणाले की,
ज्या हमालाच्या पाठीवरती ओझं दिलं जातं, त्यांना हा मान देण्यात आला. लहानातल्या लहान गोष्टीपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखानामध्ये काम करणारा प्रत्येकजण माझ्या कुटुंबातील एक घटक आहे.
यावर्षी कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदा गळीत हंगाम मोठा असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढच्या वर्षीही ऊसाचे प्रमाण आणखीच वाढणार आहे. त्यामुळे आपल्या नोंदी कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कारखाना शेतकऱ्यांनच्या हक्काचा आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल. येथील शेतकरी सुजलाम-सुफलाम होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी कारखाना आम्ही तत्पर असेल असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच व सर्व अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button