Maharashtra

स्पर्धात्मक शिक्षण आज काळाजी गरज- श्रीराम पाटील

स्पर्धात्मक शिक्षण आज काळाजी गरज- श्रीराम पाटील 

स्पर्धात्मक शिक्षण आज काळाजी गरज- श्रीराम पाटील

रावेर (प्रतिनिधी)

आजच्या स्पर्धात्मक युगात शालेय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी आपल्या संस्थामध्ये विद्यार्थ्यांना आयुष्यातील वास्तवात जगण्यासाठी स्पर्धात्मक शिक्षण देणे आवश्यक असल्याचे श्रीराम उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी रावेरयेथे शायनिंग स्टार्स अकॅडमी तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना सांगितले

या प्रसंगी प्रतिमा पूजन आदर्श विद्यालय केरहाळे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, हरीश गणवानी यांच्याहस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन सरस्वती विद्या मंदिर संस्था अध्यक्ष दिलीप अग्रवाल, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, महाराष्ट्र विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाठक, समृद्धी स्कुल चेअरमन अमोल पाटील, स्वामी विद्यालयाचे रवींद्र पवार, खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भैय्या साहेब मगर, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, डी एम भोई, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

स्पर्धात्मक शिक्षण आज काळाजी गरज- श्रीराम पाटील

प्रास्ताविकात संजय चौधरी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा देत पालकांनी विश्वास टाकल्याने त्यांचे आभार देखील मानले. रवींद्र पवार यांनी रावेरची शिक्षण पद्धती बळकटीकरण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले

कार्यक्रमाचे सूत्र संचालन हृदयेष पाटील यांनी केले तर आभार निलेश महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालिका सौ संगीत चौधरी, प्रकाश चौधरी, सेंटर प्रमुख सौ नंदा जंगले यांचे सह सर्व काही शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button