Yawatmal

धनगर नेत्यांनी समाजाला मुर्ख बनवू नये. – बिकेडी

धनगर नेत्यांनी समाजाला मुर्ख बनवू नये. – बिकेडी

यवतमाळ – प्रतिनीधी प्रफुल कोवे

अनुसूचित जमातीच्या यादीतील तो शब्द ‘धनगड’ नसून ‘धांगड’ आहेत. त्यामुळे धनगरांच्या नेत्यांनी त्यांच्या समाजाला मुर्ख बनवू नये. असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले आहे.
स्थानिक सिंघानिया नगर येथे ‘आदिवासीचे तारणहार , न्याय प्रिय महात्मा राजा रावन महागोंगो ‘ कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा राजा रावण पुजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिरसा क्रांती दलाचे महासचिव प्रमोद घोडाम, कोयापुनेम गोटूल समितीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सिडाम, आदिवासी विकास परिषदेचे
जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, आदिवासी क्रांती दलचे अध्यक्ष बंडू मसराम उपस्थित होते.
पुढे बोलतांना मडावी म्हणाले की, ओराँन जमातीची पोटजमात धांगड होय. महाराष्ट्र सरकारने १२ जून १९७९ रोजी ‘धनगर’ जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याकरीता केंद्र शासनास शिफारस केली होती.परंतू धनगर जात आदिवासींचे जमातींचे निकष पुर्ण करीत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वतःचीच शिफारस मागे घेतली आहे.
केंद्रसरकार मध्ये धनगर समाजाला ओबीसींच्या सवलती मिळत आहेत. राज्यात भटक्या जमाती म्हणून केवळ एकट्या धनगर समाजाला ३.५ % आरक्षण आहेत.एवढे आरक्षण एकट्या कोणत्याही समाजाला नाही.
आधी ओबीसी, नंतर एन.टी,आणि आता आदिवासीत आरक्षण मागणे . हे केवळ असैंविधानिकच नाही तर हास्यास्पद आहे.
महागोंगो कार्यक्रमाला आशिष गेडाम, किरण कुमरे, केशव बोरकर, शरद चांदेकर, रमेश मडावी, सुनील ढाले, संतोष कन्हाके, प्रभात कनाके, तुषार आत्राम, प्रा.अविनाश मसराम, अरुण मेश्राम, शंकर कोवे, संजय मडावी, शिवनारायण भोरकडे, अजाबराव कोडापे, अतुल कोवे, प्रबोध मडावी,विशाल राजगडकर , वैशाली मडावी, लता मडावी , शुभम चांदेकर आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके यांनी केले तर आभार जिल्हा महासचिव प्रफुल कोवे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button