फैजपूर

धनाजी नाना महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा यशस्वीपणे संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा यशस्वीपणे संपन्न

सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात दिनांक 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान भारत सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशीलकुमार, धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, म्युनिसिपल हायस्कुल चे मुख्यध्यापक आर एल आगळे यांच्या मार्गदर्शनानुसार एनसीसी अधिकारी प्रा राजेंद्र राजपूत, चीफ ऑफीसर एस एम राजपूत व कडेट्स यांनी स्वच्छता पंधरवड्यात सक्रियपणे सहभाग नोंदवला. या पंधरवड्यात दरम्यान दिनांक 1 डिसेंबर रोजी उद्घाटन करून महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर फैजपूर शहरात जनजागृती रॅली काढून हागणदारी मुक्त परिसराचा संदेश देण्यात आला. यासोबत स्वतःचे आरोग्य सांभाळून परिसर स्वच्छतेचा प्लॉगिंग हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. यासोबत पथनाट्य व घोषणा यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आज या पंधरवड्याचा समारोप सक्रिय सहभाग घेतलेल्या कॅडेटसचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यासोबत हे अभियान असेच सुरू राखण्याचा मनोदय व्यक्त केला. याकामी धनाजी नाना महाविद्यालया चे एन सी सी अधिकारी प्रा राजेंद्र राजपूत व म्युन्सिपल हायस्कूलचे एनसीसी अधिकारी चिफ ऑफिसर एस एम राजपूत व एनसीसी कडेट्स यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button