कोरोना चे रुग्ण नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू ठेवावेत अशी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देवेंद्र काजळे यांचेसहपालकांची व विद्यार्थ्यांची मागणी
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
देशभरासह महाराष्ट्रातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच राज्यातील कोरोना संख्या शहरी भागात झपाट्याने होत असलेली वाढ पाहता राज्यातील पहिली ते नववी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शाळा ऑनलाईन बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरु राहील असे निर्देश राज्य सरकारने शिक्षकांना दिले आहे. सोमवारपासून या निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरवात झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळा शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी सिनेमा थिएटर, रेस्टॉरंट, मंदिरे, आदीनां पन्नास टक्के क्षमतेने परवानगी दिली आहे. मग प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने का घेतला? शिक्षकांना व पालकांच्या विश्वासात न घेता हा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्च २०१९ पासून देशभरासह राज्यात कडक लॉकडाऊन झाले होते त्यात सर्वच शाळा जवळपास सलग दोन वर्षे बंद होत्या आता कुठे तरी शाळा सुरु झाल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षण पुर्व पदावर येत होते परत शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घेतल्याने पालकांची व शिक्षकांची नाराजी वाढली. पालकांना वाटतं, आपल्या मुलांना शाळेत जायला हवे , नाहीतर पिढी बरबाद होण्याची भीती आता पालकांना वाटु लागली आहे.
शाळा बंद केल्यानंतर मुलांना कोरोना होत नाही असे जर राज्य सरकारला वाटत असेल तरी दुसऱ्या बाजूला मुलांना सुट्टी जाहीर झाल्यापासून कोणी किक्रेट खेळायला, तर शेतात, इतरत्र मजुरीने कामाला जातांना दिसून येत आहे. म्हणजे शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मुलांना मोबाईल किंवा संगणक उपलब्ध असायला हवे. म्हणून सरकारला कळकळीची विनंती आहे की शाळा बंद करण्यापूर्वी शिक्षक व पालकांचा सल्लामसलत करुन हा निर्णय घेणे योग्य झाले असते….
*कोट*
राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय अतीघाईने घेतला असून दोन वर्षे जवळपास शाळा बंद होत्या यात शाळा सुरु झाल्यावर आम्हाला व शिक्षकांना मुलांना शाळेत आणायला मोठी कसरत करावी लागली कोरोनापूर्वी मुलांची १०० % उपस्थिती असायची आता तीच उपस्थिती ८० % वर आली होती आता किती दिवस शाळा बंद राहतील?, भविष्यात मुलांची उपस्थिती किती राहिल ? आज तरी सांगता येणार नाही.
देवेंद्र काजळे : शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष
*कोट*
कोविड १९ पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्याने, मुलं जेमतेम शाळेत रमत असतांना अचानक आलेल्या या निर्णयामुळे आँनलाईन शिक्षणाबरोबरच आँफलाईन शिक्षण देतांना शिक्षकांना गल्लीमित्र, ओट्यावरची शाळा याव्दारे अभ्यास घेता यावा.असे असले तरी शासनाने ज्या ठिकाणी कोरोना पेशंट नाहीत, तेथे कोरोना नियमांचे पालन करुन ५० % विद्यार्थी उपस्थितीची अट घालून शाळा सुरु ठेवणे अपेक्षित आहे.
सुभाष दादा विंचू पदवीधर शिक्षक जि.प.शाळा
*कोट*
दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या सातवीला असतांना शाळा बंद झाल्यापासून पास होऊन नववीच्या वर्गात गेलो आणि शाळा सुरुच झाल्यानंतर लगेच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आम्हाला घरी राहुन करमत नाही शिवाय ऑनलाइन शिक्षण घरी लक्षात येते नाही. अभ्यासक्रमात मागे पडत आहे भविष्यात दहावीचे वर्ष आहे. त्यामुळे शाळा चालु झाल्या पाहिजे
श्रेयश क्षिरसागर विद्यार्थी इयत्ता ९ वी
*कोट*
मुलं घरी असल्यावर त्रास देतात तसेच आई, वडीलच्या डोळ्यासमोर असल्यामुळे काम सांगतो या धाकाने मुले खेळायला बाहेर जातात. मोबाईलवर ऑनलाइन क्लास सुरु असतांना जाणिवपुर्वाक मुले दुरलक्ष करतात त अभ्यास न करता गेम खेळतात. तसेच घरी आई वडीलांच्या सुचनांना गांभीर्याने घेता नाही. म्हणून विनंती आहे शाळा सुरु करा.
नवनाथ ताकाटे विद्यार्थी पालक