World

?️Big Breaking..भारत आणखी एका सर्जिकल स्ट्राइक च्या तयारीत; पाकच्या परराष्ट्रमंत्री चा दावा

भारत आणखी एका सर्जिकल स्ट्राइक च्या तयारीत; पाकच्या परराष्ट्रमंत्री चा दावा

इस्लामाबाद – भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची भीती अजुनही त्यांच्या मनातून गेली नसल्याचं दिसत आहे. भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी शुक्रवारी दुबईमध्ये असा दावा केला की, पाकिस्तानकडे भारताच्या पुढच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे आहेत.
कुरेशी यांनी सांगितलं की, गुप्तचर सूत्रांकडून मला समजलं की, भारत पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राइकचा प्लॅन तयार करत आहे. ही एक गंभीर बाब आहे. मला याचीही माहिती आहे की, भारताने यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना भारत आपला भागिदार मानतो.
भारतात वाढलेल्या अंतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारचा प्लॅन आखला जात असल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं.
पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी म्हटलं की, आम्ही जगाला सांगू इच्छितो की शांतता ही सामुहिक जबाबदारी आहे. भारत त्यांच्या देशातील अंतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला अस्थिर करण्यासाठी हालचाल करत आहे. आम्ही विनंती करतो की जगाने त्यांना तसं करण्यापासून रोखावं.
पाकिस्तानकडून अशा प्रकारचं वक्तव्य पहिल्यांदा करण्यात आलेलं नाही. याआधी पाकिस्तानमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिलं होतं की, गुप्तचर संस्थांकडून अशी माहिती मिळालीय की दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी भारत पुन्हा एकदा असं करू शकतं. सर्जिकल स्ट्राइकच्या शक्यतेमुळे पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैन्याला हाय अलर्ट जारी केला आहे.
देशातील वेगवेगळ्या घडामोडी वाचण्यासाठी
ट्रिब्यूनने लिहिलं होतं की, सूत्रांच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेवर आणि भारत पाक वर्किंग बाउंड्रीवर पाकिस्तानच्या सैनिकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारताकडून सर्जिकल स्ट्राइकचा प्रयत्न झालाच तर त्याला प्रत्युत्तर द्यायला सज्ज राहण्यास सांगितलं असल्याचंही त्यात म्हटलं होतं.
भारताने 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने एअर स्ट्राइक करून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button