AmalnerIndia

भारतासह इतर आठ देशांत पर्यावरण संरक्षण चा संदेश पोहोचवणारे देवा तांबे यांना शांतिदुत परिवार चा ‘सेवारत्न’ पुरस्कार प्रदान

भारतासह इतर आठ देशांत पर्यावरण संरक्षण चा संदेश पोहोचवणारे देवा तांबे यांना शांतिदुत परिवार चा ‘सेवारत्न’ पुरस्कार प्रदान

पर्यावरण संरक्षण काळाची गरज व प्रत्येक सजीवाचे कर्तव्य तसेच समाजसेवा आपली सामाजिक बांधिलकी हे जाणून महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे तसेच इतर १६ राज्य आणि नायजेरिया, केनिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान ,श्रीलंका अशा इतर वेगवेगळ्या ८ देशांत संस्थेची स्थापन करून अविरत प्रामाणिक कार्य करीत असलेल्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.देवा तांबे यांना ‘शांतिदूत सेवारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण चे आयोजन मंगळवार,दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी,सामाजिक कार्यात संपूर्ण देशात तसेच विदेशात समाजसेवेचा संदेश देत असलेल्या शांतिदूत परिवाराचे सर्वेसर्वा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. विठ्ठलरावजी जाधव साहेब आणि सौ.विद्या ताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असलेल्या ‘शांतिदूत परिवार’ च्या वतीने अतिशय मानाचा दिला जाणारा ” शांतिदूत सेवारत्न पुरस्कार २०२१” साठी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे यांच्या कार्याची दखल घेत माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.विठ्ठलरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथे सन्मान चिन्ह,स्मरणिका व तुळशिचे रोप देवून प्रदान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शांतीदूत सेवारत्न पुरस्कार सोहळा मा.श्री.शाम देशपांडे (से.नि. IAS ) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री.शेखरजी गायकवाड ( साखर आयुक्त ,पुणे ), मा.डॉ.श्री.माधवराव सानप ( से.नि.विशेष पोलिस महानिरीक्षक ),मा.डॉ.श्री.शशांक शाह,मा.डॉ.पूनम शाह, इंग्लंड हुन मा.डॉ.परिन सोमानी (आंतरराष्ट्रीय अध्यक्ष,यूनाइटेड किंगडम,शांतिदूत परिवार ), मा.डॉ.श्री.दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर),नगरसेवक मा.श्री.धनंजय जाधव,मा.श्री.चंद्रकात मंडलिक ( विशेष पोलिस अधिकारी,सिंहगड रोड,पुणे ),मा.श्री.रवींद्र धारिया (अध्यक्ष वनराई),भारत फोर्जचे श्री.प्रभाकर वैद्य व इतर पर्यावरण सेवक,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतासह इतर आठ देशांत पर्यावरण संरक्षण चा संदेश पोहोचवणारे देवा तांबे यांना शांतिदुत परिवार चा 'सेवारत्न' पुरस्कार प्रदान

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button