Mumbai

आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांच्याशी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा..दिवाळी पूर्वी थकीत मानधन व मोबदला मिळणार

आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांच्याशी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा..दिवाळी पूर्वी थकीत मानधन व मोबदला मिळणार

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना प्रत्येकी अनुक्रमे २०००/- आणि ३००० रुपये राज्य शासनाने केलेल्या मानधनवाढीची एप्रिल २०२१ पासूनची थकीत रक्कम आणि जुलै २०२१ पासून केलेल्या मानधनवाढीची आणि कोविड भत्त्याची थकबाकी दिवाळी पूर्वी मिळावी . अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनाही भाऊबीज भेट अदा करावी, समान किमान कार्यक्रमांतर्गत जाहीर केलेली भरीव मानधनवाढीबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, कामानुसार मिळणाऱ्या मोबदल्यात भरीव वाढ करावी.
यासह अन्य प्रलंबित मागण्यांवर आज आरोग्य मंत्री मा. राजेशजी टोपे यांच्या निवासस्थानी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांनी भेट घेत निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.

यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची मानधन वाढीसह सर्व थकीत रकमा दिवाळी पूर्वी अदा करण्याबाबत संबंधितांना आदेशित केले आहे तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शासन सकारात्मक विचार करत असल्याचे मा. मंत्री महोदयांनी सांगितले.
याप्रसंगी मायाताई परमेश्वर यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील आणि सुधीर परमेश्वर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button