Pandharpur

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत सकारात्मक पावले उचलण्या बाबत प्रधान सचिवांना दिल्या सुचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत सकारात्मक पावले उचलण्या बाबत प्रधान सचिवांना दिल्या सुचना

प्रतिनिधी
रफिक अत्तार

महाराष्ट्रातील ३७४ नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी यांच्या वेतनापोटीची थकीत रु ८०० कोटी सहा वेतन अनुदान रक्कम नगरपालिकांना मिळावी तसेच सातवा वेतन आयोगाचे समान ५ हफ्ता फरकाची रक्कम नगरपालिकांना द्यावी व तसेच महागाई भत्त्याची वाढीव रक्कम मिळावी म्हणून राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांचे मार्गदर्शन खाली संघर्ष समिती च्या वतीने महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर व कामगार नेते व नगरसेवक श्री नागेश अक्कलकोटे व संघटना प्रतिनिधी यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत मुंबई येथे मंत्रालयात बैठक संपन्न झाली यावेळी मा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय मुंबई यांनी दि ३ नोव्हेंबर २०२१ च्या मागणी केलेल्या पत्रानुसार नियमित मिळणारे सहाय्यक वेतन अनुदान आणि वेतनावरील प्रत्यक्ष झालेला खर्च व शासनाने दिलेली रक्कम यातील तुट असणारी रक्कम रु ८०० कोटी मिळावी म्हणून शासनाकडे मागणी केली आहे , शासन कर्मचारी यांना महागाई भत्ता अदाई ची घोषणा करते प्रत्यक्षात मिळणाऱ्या सहायक वेतन अनुदानात त्याची वाढीव तरतुद होत नसल्यामुळे प्रत्यक्षात महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जातो परंतु या फरकाची रक्कम शासनाकडून नगरपरिषद यांना मिळत नाही तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यां बरोबरच नगरपरिषद कर्मचार्‍यांना ही सातवा वेतन आयोग लागू करून सन 2016 ते 2019 या मागील वर्षाची फरकाची रक्कम पाच समान हप्त्यात देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते आदा ही करण्यात आले आहेत परंतु महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी अजूनही सातव्या वेतनाच्या दोन हप्त्या पासून आजही वंचित आहेत शासनाने सदरची रक्कम नगरपालिकांना दिल्याशिवाय नगरपालिकांना ही रक्कम नगरपरिषद कर्मचाऱ्यांना देता येणार नाही त्यामुळे सदरची रक्कम ही शासनाने नगरपालिकांना अदा करावी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती च्या धर्तीवर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी यांचे दरमहा चे वेतन ट्रेझरी तुन करण्याच्या मागणीवर यावेळी भर देण्यात आला व येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची तरतूद करावी अशी मागणी या बैठकीच्या वेळी करण्यात आली यावेळी वरील मागण्यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता याना सकारात्मक पणे या विषयी लक्ष घालण्याच्या सूचना देऊन येत्या बजेट अधिवेशन मध्ये सदर रकमेची तरतूद करणे बाबत ची सुचना दिल्या तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशना नंतर इतर मागण्या बाबत संबंधित नगर विकास , वित्त व नगरपरिषद संचालनालय या विभागा समवेत बैठक घेण्याचे आश्वासन ना. अजित दादा पवार यांनी यावेळी दिले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button