Bodwad

करंजी येथे झालेल्या १४ वित्त आयोगाचा निधी हडप केल्या प्रकरणी सबंधीत ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी बि ए बोटे यांचा आदेश

करंजी येथे झालेल्या १४ वित्त आयोगाचा निधी हडप केल्या प्रकरणी सबंधीत ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी बि ए बोटे यांचा आदेश

बोदवड : बोदवड तालुक्यातील करंजी येथिल ग्रामसेविका व सरपंचाने १४ वित्त आयोगाचा निधी हडप केल्या प्रकरणी करंजी येथिल उपसरपंच व सदस्य यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती
बोदवड तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत सरपंच जानकिराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांनी संगममताने १४ वित्त आयोगाचा निधी परस्पर ठेकेदाराच्या नावे काढण्याचा प्रकार उघडकिस आला होता करंजी पाचदेवडी येथे १४ वित्त आयोगातुन रस्ते कॉक्रेटिकरन करण्यासाठी ठराव मंजुर होता त्या कामाबाबत कामे व्हावे यासाठी सबंधीत ठेकेदाराने गावात रेती सिमेंट इत्यादी रस्त्यासाठी लागणारे साहित्य टाकले परंतु कामे नकरताच ग्रामसेवक व सरपंच यांच्या सगंममताने ठेकेदाराच्या नावावर पुर्ण रक्कम वर्ग करण्यात आली आहे अशी स्वताहा कबुली ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांनी दिली होती तसेच ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांच्याकडे गोळेगाव करंजी असे गावे आहेत तसेच गोळेगाव येथे अंभोरे यांना चार वर्षे तरी कामाचा कार्यकाळ झाला असावा त्यामुळे गोळेगाव येथिल प्रस्थापित राजकिय मंडळीशी चांगलेच साटेलोटे आहेत असाही तक्रारीत दरम्यान दिसुन आले करंजी येथिल सरपंच व ग्रामसेविका यांनी हे काम न करताच एका ठेकेदाराच्या नावावर टाकण्याचा साहस केल्याने करंजी गावातील नागरीक चांगलेच संतापलेले दिसुन आले तसेच करंजी येथे रोजगार हमितील घरकुल लाभार्थ्यांही निधी हडपलेला असल्याची चर्चा गावातील नागरीक करित आहेत तसेच १४ वित्त आयोगाचा निधी कामे नकरता ठेकेदाराच्या नावावर परस्पर पाठवला याची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले होते व त्याच तक्रारीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि ए बोटे यांनी गटविकास अधिकरी बोदवड यांना लेखी चौकशी करुन कार्यवाही करावी असा आदेश पारित केला आहे त्या आदेशात सदरील करंजी येथिल उपसरपंच व सदस्य हे दिनांक १३ जुलै रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणास बसणार आहे असे पत्र दिले व ते उपोषणास बसणार नाही असे त्यांना परावृत्त करावे व चौकशी कार्यवाही दरम्यान ३ दिवसात तसा अहवाल जिल्हा परिषद जळगाव यांना कळवावा अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत कार्यवाही करावी लागेल अशा सुचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि ए बोटे यांनी लेखी आदेश पाठविला आहे तर या कार्यवाहीकडे संपुर्ण बोदवड तालुक्याचे लक्ष लागुन आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button