Amarawati

वंचित बहुजन महिला आघाडी अमरावती यांच्या वतीने मनुस्मृती दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री मुक्ती दिवस साजरा

वंचित बहुजन महिला आघाडी अमरावती यांच्या वतीने मनुस्मृती दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री मुक्ती दिवस साजरा

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामूहिकपणे मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर भारतातील सर्व स्त्रियांना आणि बहुजनांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती चळवळीचा महत्त्वाचा दिवस आहे.

२५ डिसेंबर २०२० रोजी अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी अमरावतीच्या जिल्हा अध्यक्ष विद्या वानखडे ,जिल्हा सचिव मीना नागदिवे ,जिल्हा महासचिव पुष्पाताई बोरकर ,राज्य संघटक निशाताई शेंडे, प्रमुख अतिथी सुकेशनी थोरात, सुनीता रामटेके, विश्रांती तायडे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button