Nashik

येवला नगरपालिकेला वंचित बहुजन आघाडी चे निवेदन विविध समस्या सोडवण्याचे आव्हान

येवला नगरपालिकेला वंचित बहुजन आघाडी चे निवेदन विविध समस्या सोडवण्याचे आव्हान

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवलानगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना येवला तालुका व शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देऊन शहरातील ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धर्मातंर घोषणा केलेल्या कोर्ट मैदान मुक्ती भुमी कडे जाणारा रस्ता तसेच शहरातील दलित वस्ती तील विविध विकास कामे व इतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले
यावेळी मुक्ती भूमी ही क्रांतिभूमी असून या मुक्ती भुमी कडे जाणाऱ्या रस्त्यात जुने पोलीस स्टेशन ते मुक्ती भूमी व जवळ असलेल्या दिवाणी न्यायालय या ठिकाणी जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्या लोकांना पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने चिखल मातीच्या घाणीचा. सामना करावा लागत असल्याने या रस्त्याची तात्काळ नव्याने दुरुस्ती करण्यात यावी तसेच दलित वस्त्यांमध्ये योजना राबवण्यात याव्या यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहराध्यक्ष संगीता साबळे, महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष रेखा साबळे, महिला संघटक शबनम शेख, वालुबाई जगताप, वंचीतचे संजय पगारे, दयानंद जाधव, युवा नेते शशिकांत जगताप, भाऊसाहेब आहिरें, वसंत घोडेराव, हरी अाहिरे, निवृत्ती घोडेराव, विठल जाधव, संदिप जोंधळे, दिपक लाठे आदीसह उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button