Amalner

विवंचना कर्जाची..! निम येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून  आत्महत्या..!

विवंचना कर्जाची..! निम येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या..!

अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विष घेतल्यानंतर दवाखान्यात उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला आहे.

फिर्यादी जितेंद्र अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निम येथील गुलाब गोपीचंद कोळी (वय ४२) यांच्या कडे 3 बिघे शेतजमीन असून शेतीवर त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच त्यांची आई ही नेहमी आजारी राहत असे. शेतीवरील कर्जामुळे व आईच्या आजारपणात लागणाऱ्या पैश्यामुळे गुलाब कोळी हे नेहमी चिंतेत असायचे. त्यातच त्यांनी १४ ऑगस्ट रोजी गोठ्यात विष प्राशन केले. त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर परत १८ रोजी अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. काल १९ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास स. फौ. बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button