Jalgaon

देवकर रुग्णालयातर्फे चार हजार रुग्णांची तपासणी जळगाव व चोपडा येथील शिबिरांना प्रतिसाद

देवकर रुग्णालयातर्फे चार हजार रुग्णांची तपासणी जळगाव व चोपडा येथील शिबिरांना प्रतिसाद

कमलेश पाटील जळगांव

जळगांव : श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयूष रुग्णालयातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या १५ दिवसांत रोगनिदान शिबिरांतून चार हजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना पुढील उपचारासाठी योग्य तो सल्ला देण्यात आला. या शिबिरांमध्ये सर्व आजारांवरील तज्ज्ञ डॅक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
रुग्णालयातर्फे २२ जुलैपासून जळगाव, चिंचोली, शिरसोली प्र. न., जळके, वावडदा, म्हसावद, सुभाषवाडी, पिप्राळा, जळगाव आणि चोपडा शहर या ठिकाणी रोगनिदान शिबिरे घेण्यात आली. शिबिरांतून नेत्ररोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्या खालोखाल बालकांमधील आजार निष्पन्न झाले. शिवाय, अस्थिरोग, स्त्ररोग, त्वचारोग, दंतरोग, हृदयरोग, मधुमेह, किडनीस्टोन व रक्तदाबाचेही रुग्ण आढळून आले. त्यांना पुढील योग्य उपचारासाठी सल्ला देण्यात आला. शिबिरात डॉ. अभिजित पाटील, डॉ. वैभव गिरी, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. शैलेजा चव्हाण, डॉ. श्रीराज महाजन, डॉ. रेणुका चव्हाण, डॉ. स्वप्नील गिरी, डॉ. प्रियंका चौधरी, डॉ. तेजस पाटील, डॉ. अमित नेमाडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. आश्‍विनी चव्हाण, डॉ. कुशल चौधरी, डॉ. हेमंत पाटील व डॉ. भूषण चव्हाण या विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. सर्व ठिकाणच्या शिबिरांचा समन्वयाचे काम रुग्णालयाचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. नितीन पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button