Nashik

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवा. आरपीआयचे सोमवारी पंढरपूर तहसील समोर निदर्शने.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवा. आरपीआयचे सोमवारी पंढरपूर तहसील समोर निदर्शने.

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवण्यात यावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदर समितीमधून बाहेर काढून त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील मंत्र्याची नेमणूक करण्यात यावी. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवार दिनांक 7 जून रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश संघटन सचिव दिपक चंदनशिवे यांनी दिला आहे.
मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणाच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने राज्यभर राज्य सरकार विरोधात आक्रोश केला जात आहे. मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे, काही विशिष्ट समाजाला खूष करण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आल्याने सदर समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात यावी. व त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील मंत्र्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक 7 जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन लोकशाही मार्गाने व कोरोना महामारी मुळे सर्व नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button