Rawer

रावेर पोलिस निरीक्षकाच्या निर्दयी कारवाई ने पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन…कठोर कारवाई करण्याची पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

रावेर पोलिस निरीक्षकाच्या निर्दयी कारवाई ने पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन
रावेर पोलिस निरीक्षक व प्रशासनाविरोधात जन माणसांत तीव्र रोष
मुस्लिम इस्लामी आंतकवादी संबोधल्याने मुस्लिम समाज संतप्त
पो.नि यांची चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

रावेर/ मुबारक तडवी
रावेर पोलीस निरीक्षकांकडून घरगुती भांडणातुन एकतर्फी गुन्हा दाखल करून सहा मुस्लीम युवकांना बेदम व अमानुषपणे मारहण,
इस्लामी आतंकवादी व शिवीगाळ करून माहरण करीत केली गंभीर दुखापत
पो.नि यांची चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
रावेर येथे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचा मनमानी व हम करे सो कायदा या वागण्यामुळे घरगुती भांडणाचा एकतर्फी गुन्हा दाखल करून सहा युवकांना बेदम व अमाणुषपणे मारहाण गंभीर दुखापत करून अश्लील शिवीगाळ केली तसेच पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांची वर या प्रकरणी बाबतची चौकशी होवून कारवाई करण्यासाठी अब्दुल रहेमान शेख करीम इस्लामपुरा अक्सा मस्जिद भोई वाडा रोड रावेर ता.रावेर जि.जळगाव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर असेकी दि.०२ / ११ / २०२१ मंगळवार रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान अक्रम व अमजद यांच्या मध्ये मोटर सायकलच्या कटबाजीमुळे कीरकोळ भांडन झाले हे प्रकरण असुन पोलीस स्टेशनला आले असता पोलीस निरीक्षक कैलास नगरे यांनी दोन्ही युवकांना समज न देता १०७ चपटर केस दाखल केली व चार युवकांना काठ्या व पट्ट्याच्या साह्याने हाते पिवळे होईल पर्यंत व कमरेवर बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. व बाबर शेख ( तक्रारदाराचा मुलगा ) यांना एवढी मारहाण केली की त्यांचा दोन्ही पायाचा फेक्चर झाले आहे. त्याच्याने उठबस पण होत नाही या आधीच बाबर शेख यांचा दोन्ही पाया मध्ये रोड टाकलेले आहे. पो.नि.कैलास नागरे यांनी सहा युवकांना बेदम मारहाण केलेली आहे व या युवकांना इस्लामी आतंकवादीचे नावाने शिवीगाळ देखील केलेली आहे कुठलाही गंभीर गुन्हा या युवकांनी केलेला नसतांना यांना मारहाण व शिवीगाळ करण्याच्या अधिकार दिला कोणी ? पो.नि. कडून नागरीकामध्ये पदाचा दुरूपयोग करून सर्व सामान्य जनतेत दहशत निर्माण करून मारहण करणे योग्य आहे. का. ?कैलास नागरे यांनी रावेर पोलीस स्टेशनला रुजू झाल्या पासून मोठ्या प्रमाणात जनतेत दहशत माजवली व जनतेस वेठीस धरले आहे.आहे.त्यांच्या मनमानी वागण्याने व हुकूमशाहीने तसेच कोणत्याही
कामात पैशाची मागणी करीत असल्याने लोक त्रस्त झाले आहे . तरी मा. जिल्हापोलीस अधीक्षक यांनी मारहाण झालेल्या सहा युवकांना प्रत्यक्ष बोलवून शाहनिशा करावी व आम्हाला न्याय द्यावे अन्यथा पोलीस निरीक्षक कैलाश नगरे यांच्या विरुद्ध मानवअधिकार नवी दिल्ली यांचाकडे न्याय मागणार असल्याची मांगनी तक्रारदार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले असुन यात पो.नि. कैलास. नागरे यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button