sawada

सावद्यातील २ वर्षापासून पालिका हद्दीत समाविष्ट नविन भागात एलईडी लाईट नवीन पोल लावण्याची स्मरणपत्र द्वारे केली मागणी: राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण

सावद्यातील २ वर्षापासून पालिका हद्दीत समाविष्ट नविन भागात एलईडी लाईट नवीन पोल लावण्याची स्मरणपत्र द्वारे केली मागणी: राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे नवीन विविध भाग गेल्या २ वर्षापासून सावदा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाले असता या भागात रहिवासी नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून नवीन एलईडी लाईट व वीज पोल लावण्याची मागणी वेळोवेळी केली असता त्याची दखल पालिका प्रशासन सह नगराध्यक्षा यांनी न घेतल्याचे दिसून आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा नगरपरिषदेच्या हद्दीत असलेले गौसिया नगर, मदिना नगर, रजा नगर, पनाहा पीर नगर, ताजुसशरिया नगर व सावदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील नवीन भागात रहिवासी नागरिकांना एलईडी लाईट नवीन वीज पोल लावून मिळावे. तसेच इतर सुख सुविधा यांना उपलब्ध करावे.

या नवीन भागातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा विषारी साप, विंचू, हिंसक प्राणी यांचा वावर अंधार असल्यामुळे जीवितास त्रास वाढलेला आहे.तसेच या भागात चोरीच्या घटना झालेल्या असून २ ते ३ ठिकाणी ५ ते ६ जणांच्या टोळक्याने चोऱ्या केलेल्यांचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहेत. तसेच याबाबत अधिकृत रित्या सावदा पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणाची नोंद देखील करण्यात आलेली आहे.

नवीन हद्दवाढ झाल्या अगोदर येथील रहिवासी नागरिकांकडून पाणीपट्टी व अनामत रक्कम दुप्पटीने घेतली जात होती व आहे. मात्र गेल्या दोन वर्षापूर्वी पासून सदरील संपूर्ण नवीन भाग हे नगरपालिका हद्दीत समाविष्ट असल्याने यापुढील पाणीपट्टी व अनामत रक्कम हद्दीतील क्षेत्राप्रमाणे आकारण्यात यावी अशी मागणी देखील मुख्य अधिकारी किशोर चव्हाण यांना आज दि.१४/१०/२०२१ रोजी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण, नगरसेविका नाझीरा बी बागवान, अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू मेंबर, इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा अध्यक्ष अकबर खान, गजानन ठोसरे, समशेर तडवी, शहीद अब्दुल हमिद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार, उपाध्यक्ष फिरोज खान, हुसैन भाई चाय वाले, सुरेश मिठाराम तायडे, अल्लारखा, अश्फाक बागवान, शेख अरबाज, शेख अख्तर, बासित खाटीक, नईम भाई मोबाईल वाले,यांच्यासह सदरील परिसराचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितांन समोर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नियमानुसार आपल्या मागण्या शक्य तेवढ्या गतीने निवारण करण्याचे आश्वासन दिले.

“भाजपाची लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांनी गेल्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी सभा आटोपल्यानंतर शादी हॉल इत्यादी नागरिकांच्या समस्या मांडण्याकरिता राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण व त्या प्रभागातील नागरिक पालिकेत नगराध्यक्षा यांच्या दालानात गेले असता तुम्ही कोणाच्या परवानगीने माझ्या दालनात प्रवेश केला असे नगराध्यक्षपदाला न शोभणारे वक्तव्य केल्याची माहिती नगरसेवक फिरोज खान पठाण यांची मुलाखत घेते वेळी पत्रकारांना बोलून दाखवली.”तसेच येत्या सर्वसाधारण सभेत सदरील समस्यांचे निवारण न झाल्यास लोकशाही मार्गाने पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button