Pune

आदिवासी प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प आधिकारी यांच्याकडे मागणी – ट्रायबल फोरम

आदिवासी प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प आधिकारी यांच्याकडे मागणी – ट्रायबल फोरम

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

घोडेगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात नवीन रूजू झालेले प्रकल्प अधिकारी गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच विविध आदिवासी भागातील विविध प्रश्नांवर चर्चा उत्साहात पार पडली.
प्रामुख्याने वडगाव मावळ येथील कक्षात प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणे. मावळ तालुक्यातील आदिवासी समाजास विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे. विद्यार्थी शिष्यवृत्ती तपासणी करणे व शिष्यवृत्ती देणे. वडेश्वर आश्रम शाळा व इतर आश्रम शाळा भेटी तपशील देणे. आदी विषयांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी मागणी करण्यात आली.
या वेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर, सहाय्यक प्रकल्प शिक्षण विभाग नवनाथ भवारी, कार्यालय अधिक्षक योगेश खंडारे, किवळे कशाळ सरपंच तथा विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर गुरूजी, मावळ आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा ट्रायबल फोरम युवक जिल्हाध्यक्ष विक्रम हेमाडे, तालुका अध्यक्ष कांताराम असवले, वडेश्वर माजी सरपंच तथा जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव गभाले, माळेगाव बु. सरपंच तथा ट्रायबल फोरम आंदर मावळ विभागीय अध्यक्ष राजेश कोकाटे, सावळा सरपंच नामदेव गोंटे, प्रसिद्धी प्रमुख मधुकर कोकाटे, प्रमुख ट्रायबल फोरम मावळ मार्गदर्शक अनिल कोकाटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button