Faltan

ईद होई पर्यँत मार्केट उघडू नये निवेदनाद्वारे हिंदू -मुस्लीम बांधवांची मागणी ,यंदा साध्या पद्धतीने ईद साजरी करण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

ईद होई पर्यँत मार्केट उघडू नये निवेदनाद्वारे हिंदू -मुस्लीम बांधवांची मागणी ,यंदा साध्या पद्धतीने ईद साजरी करण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

सलीम पिंजारी

फैजपूर– येथून जवळच असलेल्या नहावी तालुका यावल देशात कोरोना विषाणु आढळल्याने दिल्ली येथील संपूर्ण देशाततबलीगी जमातमुळे कोरोना आला अशा बातम्या प्रसारीत झाल्याने संपूर्ण मुस्लीम समुदायाला टारगेट करण्यात आले होते. न्हावी शहरात कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी
खबरदारी म्हणून रमजान ईद पर्यंत खरेदी-विक्रसाठी मार्केटउघडण्याची परवानगी देवू नये या मागणीचे निवेदन इन्सिडेंट कमांडर तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना आज देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण जगासह आपल्या भारत देशातही सर्वत्र कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे.तसेच सदरील कोरोना विषाणुंचे रुग्ण हे सर्वाधिक आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. परंतु असे असले तरी सदरील कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अद्यापही आपल्या यावल – रावेर तालुक्यात झालेला नाही.तसेच न्हावी शहरात देखील सदरील विषाणुंचा शिरकाव झालेला नाहीवतो होवू सुध्दा द्यायचा नाही मा.जिल्हाधिकारी सो.जळगांव यांनी आपल्या संदर्भीय पत्रकान्वये दि.३ मे २०२० रोजी कडक आदेश पारत करुन सदरचे कारोना विषाणुयारोगाचे वाढीव प्रकार होवू नये म्हणून दररोज संध्याकाळी ७ तेसकाळी ७ पर्यंत संचारबंदी आदेशलाग केले आहे.कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे.व सर्व लोक हे त्यांचा कामधंदाबंद करुन घरात वसलेले आहे. तसेच आता रमजान महिना सुरु असून रमजान ईद तोंडावर आहे.त्यामुळे आपण जर न्हावी शहरात मार्केट सुरु करण्याची परवानगी दिली तर लॉकडाऊन मुळे कामधंदा बंद करुन घरी बसलेले लोक खरेदी विक्रीसाठी घराबाहेर पडतील तसेच बाहेरील गावचे व्यापारीसुध्दा व्यापार करण्यासाठी चोरी छुप्या मार्गाने न्हावी शहरात दाखल होतील व एकदमच सर्वत्र गर्दी होईल. व सदरील गर्दी मध्ये जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आला तर त्याच्यामुळे संपूर्ण न्हावी शहरात व परीसरात कोरोना विषाणुंचा फैलाव होईल.व आणखी सर्वत्र मुस्लीमांचे नांव खराब होईल.
व रमजान ईदला गाल-बोट लागेल.तसेच सदरील रोग हा इतका विचीत्र आहे की,काही लक्षणे दिसत नसल्यावरही चांगल्या माणसालाही तो होवू शकतो. यामुळे जर मार्केट खुले केले तर न्हावी शहरात सदरील कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव वाढून सर्वत्र फैलेल.व न्हावी शहराचे वातावरण दुषित होईल तसेच न्हावी शहरातील व परीसरातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल.

तरी या सर्व गोष्टी विचारात घेवून ब खबरदारी म्हणून आम्ही सर्व खालील सह्या करणारे हिंदू-मुस्लीम बांधव आपणास हे निवदेन सादर करतात की, रमजान ईद पर्यंत आपण न्हावी शहर व परिसरात कोणत्याही प्रकारची मार्केट सुरु करण्याची परवानगी देवू नये. व न्हावी व परिसरात कोरोनाविषाणुचा शिरकाव होवू देवू नये असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर न्हावी शहरातील हिंदू -मुस्लीम बांधवांच्या स्वाक्षऱ्या सरदार तडवी नदीम पिंजारी जावेद तडवी अलिशान तडवी जाबाज खान रफिक पिंजारी साजिद मन्यार दाऊद मणियार आfहेत या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना रवाना केल्या आहेत.

Leave a Reply

Back to top button