Nashik

पिक विम्यासंदर्भात शेतकरी सुपुत्राचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार व कंपनीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे पिक विमा मिळण्याची मागणी.

पिक विम्यासंदर्भात शेतकरी सुपुत्राचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार व कंपनीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे पिक विमा मिळण्याची मागणी.

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक:- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकरी कमळाबाई भास्कर मराठे यांचे नातू जयदिप बन्सीलाल लौखे-मराठे यांनी आज पिकविमा न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार व कंपनी प्रतिनिधी यांना निवेदन दिले.
निवेदनात लौखे-मराठे यांनी म्हटले आहे की, माझ्या आजी नामे कमळाबाई भास्कर मराठे रा. वेल्हाणे यांनी 2021-22 या वर्षाच्या खरीप हंगामाचा पिकविमा काढला होता, मुकटि कृषी विभागातील अनेक शेतकर्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली असून कमळाबाई भास्कर मराठे यांना रक्कम अजुनही मिळाली नाही, कंपनीशी संपर्क केला असता कंपनीने शेतकरी कुटुंबाला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आज जयदिप बन्सीलाल लौखे-मराठे यांनी स्वतः निवासी जिल्हाधिकारी संजयजी गायकवाड साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक जोशी साहेब, नायब तहसीलदार येवले साहेब व कंपनी प्रतिनिधी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. व पुढील पंधरा दिवसात रक्कम न मिळाल्यास दि.26/01 रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची भेट घेवुन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे लौखे-मराठे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात म्हटले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button