Paranda

सिना नदीवरील वागे गव्हाण चा बंधारा फुटून शेतकऱ्यांचे जमिनी वाहुन गेल्या भरपाई देन्याची मागणी  बंधारा सलग दुसऱ्या वर्षी फुटला

सिना नदीवरील वागे गव्हाण चा बंधारा फुटून शेतकऱ्यांचे जमिनी वाहुन गेल्या भरपाई देन्याची मागणी बंधारा सलग दुसऱ्या वर्षी फुटला

सुरेश बागडे परंडा

परंडा : सिना नदीवरील वागेगव्हाण चा बंधारा फुटल्याने नदी काठच्या शेतकऱ्यांचे जमीनी वाहुन गेल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देन्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे राज्य सचिव अमोल काळे यांनी तहसिलदार यांच्या कडे केली आहे .
दि ४ ऑक्टोबर रोजी तहसिलदार यांना मागणीचे निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टी मुळे सिना नदीला पुर येऊन वागेगव्हाण येथील बंधारा आहे .
या पाण्यामुळे परंडा तालूक्यातील सिना नदी काठच्या वागेगव्हाण येथील अनेक शेतकऱ्यांची जमीनी वाहुन गेल्या या मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे
या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देन्यात यावी अशी मागणी करन्यात आली आहे निवेदनावर विनोद जगताप , अमोल जगताप , बाबुराव चव्हाण , गणेश चव्हाण , अतुल चव्हाण , संतोष जगताप , दिलीप थोरबोले,कानीफनाथ थोरबोले , तानाजी थोरबोले, बाळू थोरबोले, श्रीहरी थोरबोले, पोपट थोरबोले,
अनिल जगताप, रामचंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button