शिरपूर

आदिवासी समाज सभागृहासाठी नगरपालिका क्षेत्रात जागा मिळण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

आदिवासी समाज सभागृहासाठी नगरपालिका क्षेत्रात जागा मिळण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

प्रतिनिधी, शिरपूर मनोज पावरा
आदिवासी बहूल शिरपूर तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या सोईसाठी नगर पालिका क्षेत्रात आदिवासी समाज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा यांच्याकडे निवेदनाद्वारे बिरसा क्रांती दलाने केली. सदर मागणीचे निवेदन आमदार, उपनगराध्यक्ष यांनाही देण्यात आले.

मागील दहा वर्षांपासून आदिवासिंसाठी राखीव असलेल्या आणि आदिवासी बहूल शिरपूर विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या धोरणानुसार आदिवासी समाजाची संस्कृती, अस्मिता जोपासणे आणि रात्री – बेरात्री, अडीअडचणीच्या वेळी आदिवासी बांधवांची सोय व्हावी याकरीता तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी समाज सभागृहाची आवश्यकता असल्याने नगर पालिका क्षेत्रात आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्याकडे बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी बीकेडीचे तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, सचिव गेंद्या पावरा, सागर मोरे, समाधान ठाकरे, धनराज पावरा,आदावासी टायगर सेनेचे दिनेश पाडवी, क्रांतीवीर खाज्या नाईक मित्र मंडळाचे सुंदर पावरा, दिनेश पावरा, शिवसेनेचे तालुका संघटक मुकेश शेवाळे, मायकल ठाकरे, संजय मेहता, शांतीलाल पावरा, माणिक पावरा, अजय पावरा, सुभाष पावरा, चेतन पावरा, ईश्वर भील, मधुकर मालचे, रविंद्र वाघ, एकनाथ भील, शालीक भील, रेता पावरा, राधेशाम पावरा, सुनिल मोरे, भगवान भील, संदीप भील, पिंट्या भील, संदिप पावरा, अर्जून पावरा,आदींसह एकलव्य युवा सेना संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button