Parali

दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कुलचे दुसरे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे; अभिनेत्री प्रार्थना बेहरेंची उपस्थीती

दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कुलचे दुसरे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे; अभिनेत्री प्रार्थना बेहरेंची उपस्थीती

राजेश सोनुने

परळी,(प्रतिनिधी):- दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कुलचे द्वितीय वार्षीक स्नेहसमेलन दि २३ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाळेतील विद्यार्था्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लातुरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, प्रसिध्द सिनेअभिनेत्री मितवा फेम प्रार्थना बेहरे, तसेच किरण गित्ते, सचिव नगरविकास, पर्यटन व उद्योग विभाग, त्रिपुरा, विवेकानंद वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते, दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कुलचे प्राचार्य मनोज सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना लातुरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी आपल्या पाल्यास वेळ दिला पाहिजे. मुलांच्या कौशल्य विकासावर भर देताना त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या पाहिजेत. धावपळीच्या युगात पालकांनी मुलांसाठी वेळ देणे व त्यांच्याशी योग्य संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. चांगल्या शाळेत प्रवेश घेतल्याने पालकांची जबाबदारी संपत नाही तर आणखीन वाढते हे लक्षात घ्यावे.

सुप्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी बोलताना व्यक्त केले की, पालकांनी मुलांचा आदर्श ठेवला पाहिजे. कारण तुमच्या दृष्टीेने आई वडील हीच खरी आदर्श असतात. तर आई बाबांचे ध्येय हे मोठे जरूर असतावेत पण मुलांच्या क्षमतांचा विचार करून मुलांची ध्येय निश्चीत करावीत.

दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कुलचे मुख्यध्यापक मनोज कुमार सिंह यांनी वार्षिक अहवाल सादर केला. पुढील वर्षी शाळेमध्ये स्वीमिंग पुल, घोडेस्वारी, रोबोटीक्स लॅब, एन सी सी, जर्मन भाषा सूरु करणार असल्याचे सांगितले.

श्री किरण गित्ते यांनी आपल्या देशात तसेच परदेशात शैक्षणिक क्षेत्रात ज्या चांगल्या सुविधा व पध्दती आहेत त्या या शाळेत उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.

शाळेच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो व व्यक्तिमत्व विकास घडतो असे उद्गार केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘अनुभुती’ हा मानव जिवनांतील नवरसांवर आधारीत कला, नृत्य व संगीत सादर केले.

Leave a Reply

Back to top button