Nanded

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कोण मारणार बाजी? निवडणूक आयोगाने देशभरातील 30 विधानसभेच्या जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कोण मारणार बाजी? निवडणूक आयोगाने देशभरातील 30 विधानसभेच्या जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

नागेश इबितवार नांदेड

नांदेड : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेचा यामध्ये समावेश आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.
नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button