Rawer

निंभोरा येथे पोलीस बांधवांना मल्टीपर्पस कोल्ड प्युरिफायर फायर मशीन लोकार्पण

निंभोरा येथे पोलीस बांधवांना मल्टीपर्पस कोल्ड प्युरिफायर फायर मशीन लोकार्पण

संदिप कोळी निंभोरा, रावेर

रावेर : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर बातमीदार येथील पोलीस स्टेशन येथे निंभोरा येथील युवा रसिक मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री एस डी चौधरी यांचे पुणे येथील आप्तस्वकीय निकटवर्ती श्री मोहन विष्णू बऱ्हाटे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या समर्पण भावनेतून खरे फ्रंटलाईन कोरोना योद्धा सतत अविरत कर्तव्यदक्ष असणारे आपले पोलीस बांधव यांच्यासाठी जलसेवा म्हणून पोलीस स्टेशनला गरम व थंड पाण्याची प्युरिफायर उंबर असे युनिट मशीन देत समाजसेवेचा वेगळा आदर्श घडविला. वरील लोकार्पण सोहळ्याचे चित्र मोबाईल द्वारे ऑनलाइन संपर्क साधक पुणे स्थित देणगीदार श्री मोहन बऱ्हाटे यांना “याची देही याची डोळा”म्हणी प्रमाणे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी घडविला
यावेळी मल्टीपर्पज कोल्ड मशीनचे चे उद्घाटन येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्वप्नील जी उनवणे यांच्या हस्ते कापून लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी निंभोरा येथील डॉक्टर एस डी, तंटा मुक्ती चे अध्यक्ष कडू शेठ चौधरी, माजी सरपंच दिगंबर चौधरी, ह भ प सुभाष महाराज, दुर्गादास भाऊ पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजू बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिराडे, दिलशाद शेख, दस्तगीर खाटीक, मिलन कोडे, आशिष बोरसे गावातील विविध मान्यवर सर्व पोलीस स्टॉप होमगार्ड व ग्रामस्थ उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ कोंडे, प्रास्ताविक डॉ. एस.डी .चौधरी, यानी व आभार गोपनीय विभागाचे पोलीस स्वप्निल पाटिल मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button