Amalner

Amalner: अमळनेरात संत गाडगेबाबा सभाग्रहाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

अमळनेरात संत गाडगेबाबा सभाग्रहाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

अमळनेर युवा परीट धोबी मंडळ, अमळनेर अंतर्गत कार्यसम्राट मा.आमदार श्री शिरीषदादा हिरालाल चौधरी यांच्या विशेष आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या संत गाडगेबाबा सभागृहाचे लोकार्पण सोहळा’* दिनांक 1 मे 2022 रविवार रोजी सायंकाळी संत सखाराम महाराज ह.भ.प प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यसम्राट मा.आमदार श्री शिरीषदादा हिरालाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी बोलताना संत सखाराम महाराज गादीपती ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी सदर जागेसाठी वेळोवेळी समाजास मार्गदर्शन व सहकार्य केले, तसेच भविष्यातही सदर जागेच्या विकासासाठी व मोठे सभागृह वगैरे बांधकामासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
कार्यसम्राट आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणात तालुक्यात धोबी समाज मोठा आहे परंतु समाजासाठी स्वतःच्या सभागृह हॉल नव्हते या माझ्या समाज बांधवांना स्वतःची वास्तू व सभागृह असावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ती मी आमदार निधीतून सभागृहाच्या स्वरूपात पूर्ण करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो. समाज सेवा करताना कोणती पद, प्रतिष्ठा , पैसा, हा कोणत्या समाजाचा आहे हे मी कधीच पाहिले नाही.प्रत्येक समाजाला समान प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. धोबी समाजाला सुद्धा न्याय दिला
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ता
श्री दिपक उखर्डू वाल्हे व महिला पोलीस सौ.रेखा ईशी यांना अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या वतीने श्री संत सखाराम महाराज गादीपती ह.भ.प. संत प्रसाद महाराज व मा.कार्यसमाट आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या हस्ते ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष परिट धोबी समाज आण्णासाहेब श्री एकनाथराव बोरसे गुरुजी हे होते तर श्री सुरेश ठाकरे, श्री अरुण धोबी , श्री सर्जेराव बेडीस्कर, श्री ईश्वर मोरे, श्री वासुशेठ सोनवणे, श्री धनंजय सोनवणे, श्री राकेश वाघ, श्री दिपक बाविस्कर, श्री प्रविण पाठक, श्री सुरज परदेशी,श्री सुनिल भोई,श्री जीवन पवार तसेच युवा परिट धोबी मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र जाधव, उपाध्यक्ष श्री उमेश वाल्हे , उपाध्यक्ष श्री अविनाश जाधव, तालुकाध्यक्ष श्री गंगाराम वाल्हे, लाँन्डी संघटना अध्यक्ष श्री मधुकर निंबाळकर आदी व सर्व समाज बांधव उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद जाधव सर व सुत्रसंचालन श्री दिपक वाल्हे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विजय वाघ सर ( सचिव ) श्री अनिल जाधव ( सहसचिव ) श्री मोतीलाल जाधव ( खजिनदार ) कार्यकारी सदस्य श्री गणेश नेरकर, श्री अनिल वाघ, श्री मनोज निकुंभ, श्री गिरीश चित्ते, श्री भरत जाधव तसेच सल्लागार श्री सतिश पवार, श्री किशोर महाले, श्री भरत येशी, श्री जीवन पवार,श्री अनिल मांडोळे, श्री नितिन जाधव ,श्री विक्की जाधव व सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम प्रसंगी समाज बांधव व भगिनी व तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button