Nashik

प्रभाग १६ उपनगर येथील भीमगौरव स्तंभाच्या नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न..

प्रभाग १६ उपनगर येथील भीमगौरव स्तंभाच्या नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न..

राहुल दिवे यांच्या कार्याचे समाजातील नागरिकांकडून कौतुक- कवि.भिमश्री विजयराज पगारे यांचे प्रतिपादन

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= नाशिक येथील उपनगर येथे प्रभाग १६ चे नगरसेवक राहुल दिवे यांच्या सौजन्याने तसेच त्यांच्या प्रयत्नातून आणि कवि.भीमश्री. भारतीय बहुजन सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष विजयराज पगारे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उपनगर येथे असलेल्या भीमगौरव स्तंभाचचे शुशोभीकरण/नूतनीकरण करण्यात आले असून त्या कामाचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. विजयराज पगारे यांच्या वतीने लोकनेते माजी महापौर अशोकभाऊ दिवे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भीमगौरव स्तंभाच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी यांचे आभार व्यक्त करत विजयराज राज पगारे यांनी दोन्ही नगरसेवकांचा सत्कार-सन्मान केला व आलेल्या पाहुण्यांना सन्मानित केले. समाजातील कामांसाठी मी नेहमी प्रमाणे तत्पर राहील असे राहुल दिवे यांनी ह्यावेळी आपल्या भाषणात सांगितले तसेच सोहोळयास जेष्ठ नेते पी.के.गायकवाड, अविनाश गायकवाड, डॉ.भास्कर महरसाळे, अनिल जोंधळे, अरुणा उघाडे, रफिक तडवी, निखीलकुमार रोकडे, शीला पगारे, किशोर गांगुर्डे, डॉ.प्रशांत घोडेराव, सुरज पगारे, अनिल देठे, योगेश जाधव, अविनाश उघाडे, संजू लोखंडे, सचिन पगारे, राहुल देवरे, अनिकेत गांगुर्डे, जयेश सोनवणे, योगेश ननावरे, मुकुंद बागुल वार्तापत्र शोधा॑शऺ चे पञकार डॉ राजेश साळुंके, शिवाजी गायकवाड , पञकार शांताराम भाऊ दुनबळे यांच्यासह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button