Aurangabad

हृदयद्रावक! कोरोनामुळे आई आणि शिक्षक मुलाचा मृत्यू

हृदयद्रावक! कोरोनामुळे आई आणि शिक्षक मुलाचा मृत्यू

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोना महामारीत अनेकांनी जवळची माणसे गमावली. अशीच धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे घडली आहे. अवघ्या पाच दिवसांत आई आणि शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुलाचा कोरोनाने बळी घेतला. विहामांडव्यातील उमेश नांदरे हे पाचोडजवळील थेरगाव येथील विद्यालयात शिक्षक होते.

गेल्या आठवड्यात उमेश नांदरे यांच्या आई आणि रेणुकादेवी शरद कारखान्याच्या माजी संचालिका कौशल्याबाई यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी नेवासा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घरातील अन्य सदस्यांची तपासणी केल्यानंतर शिक्षक उमेश नांदरे (वय 33) पॉझिटिव्ह आले.

उपचार सुरू असलेल्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कुटुंबावर दु:ख असतानाच दुसरीकडे औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात उमेश नांदरे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर शनिवारी त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button