Solapur

दत्ता मामा माफी मागा नाही तर जीभ हासडून हाती देऊ…

दत्ता मामा माफी मागा नाही तर जीभ हासडून हाती देऊ…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणमधील पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. मात्र आता, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनीच मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना दत्तामामांचा तोल घसरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या’ असं आक्षेपार्ह विधान केलं आहे. यावर आता शिवसैनिकांच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिवसेना सोलापूर शहर संपर्कप्रमुख आणि नगरसेवक गुरूशांत उत्तरगावकर यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्याने ‘मामा दिलीगिरी व्यक्त करा नाहीतर जी जीभ घसरलीय ती हासडून हातात देऊ’ असा इशारा दिला आहे.

‘पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनुद्गार काढल्याचे ऐकण्यात आलं. बोलताना त्यांची जीभ घरसली असेल मात्र त्यांनी चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करावी, शिवसैनिकांची माथी भडकावण्याचं काम करू नये. राज्यात महाविकास आघाडी चांगलं काम करत असताना असं विघ्न आणणे योग्य नाही. उद्धवसाहेब मुख्यमंत्रीनंतर पण शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे जर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली नाही आणि तशीच खुमखुमी तुम्हाला असेल तर ज्या जिभेने तुम्ही हे बोलला आहात ती जीभ हासडून हातात दिल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा इशारा उत्तरगावकर यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button