Amalner

दळभद्री महाविद्यालय आणि संस्था चालक..! विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यास प्रतापच्या प्राचार्य व संस्था चालकांना वेळ नाही! इतर “प्रताप” मात्र जोमात..!

दळभद्री महाविद्यालय आणि संस्था चालक..! विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यास प्रतापच्या प्राचार्य व संस्था चालकांना वेळ नाही! इतर “प्रताप” मात्र जोमात..!

अमळनेर प्रताप महाविद्यालय हे एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेले आणि प्रसिद्ध महाविद्यालय होते.गेल्या काही वर्षात ह्या महाविद्यालयाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत.ह्या महाविद्यालयाला अनेक वर्षांपासून विद्यार्थी मात्र जोरदार परंपरा टिकवून आहेत.नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कौशल्यात भारतभर डंका वाजविला आहे! पण त्यांचे कौतुक करायला प्राचार्य, व संस्थाचालकांना मात्र विसर पडला आहे. येथील संस्था चालक त्यांचे स्वतः चे भले कसे होईल एव्हढच पाहत असतात.आणि इतर प्रताप गाजविण्यात व्यस्त असतात.विद्यार्थी येथील प्राध्यापक वेळोवेळी नवीन यशाची शिखरे पार करत असतात.पण त्यांचे कौतुक करायला मात्र त्यांच्या कडे वेळ नाही अशी चर्चा महाविद्यालय परिसरात सुरू आहे.

प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी ऐन सी सी, ऐन एस एस, विविध खेळ/राज्य वा राष्ट्रीय स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व, निबंध, नाट्य, या सह अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत असल्याची परंपरा कायम आहे.
संशाचालक वा कुणाच्याही वाढदिवसाच्या पानभरून जाहिराती दिल्या जातात.. पण ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावर नॅक मानांकनात स्टार (गुण) मिळतात त्यांना मात्र प्रताप व्यवस्थापनाने वाऱ्यावर सोडले आहे!
आपण जिंकून आलो याचे प्राचार्य व मान्यवरांनी कौतुक करायला हवे शाबासकी द्यायला हवी इतकी साधी अपेक्षा प्रताप चे जेते विद्यार्थी करतात ती इच्छा देखील पूर्ण केली जात नसल्याचे लाजिरवाणे चित्र सानेगुरुजींच्या कर्मभूमीत,एकेकाळच्या शिक्षण पंढरीत दिसून येत आहे.
कमीत कमी मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे अशी अपेक्षा पालक ,विद्यार्थी आणि येथील अध्यापक नाव न छापण्याची अट टाकत तक्रार करतात.
विविध स्पर्धां मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे खस्ता खात दूरवर प्रवास करून आल्यानंतर बिल पास करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जातो, तिकीट झूम करून तपासले जाते, त्यातही हा खर्च अनावश्यक अशी टिपणी मारून कपात केली जाते अश्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.संस्था आणि प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे अन्यथा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धां मध्ये विद्यार्थी सहभागी होणार नाहीत.अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button