Khirdi

निंभोरा रेल्वे स्थानकावर दादर अमृतसर (पठाणकोट )एक्सप्रेस थांब्याला खो…

निंभोरा रेल्वे स्थानकावर दादर अमृतसर (पठाणकोट )एक्सप्रेस थांब्याला खो…

प्रविण शेलोडे रावेर

खिर्डी : येथील निंभोरा रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून दादर अमृत्सर एक्सप्रेस ही गाडी क्रमांक अप ०१०५७ व डाउन ०१०५८ अशी दोन्हीकडील प्रवासासाठी म्हणजेच मुंबईकडे दिल्लीकडे जाण्यासाठी एकमेव अशी पठाणकोट एक्सप्रेस गाडी आहे
मात्र गेल्या दीड वर्षापासून कोरोना मुळे सर्वच प्रवासी गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते मात्र आता प्राप्त माहितीनुसार येत्या 16 जून पासून दादर अमृतसर एक्सप्रेस विशेष गाडी या नावाखाली सुरू होणार आहे व या गाडीला निंभोरा येथे थांबा न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे .
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे निंभोरा पंचक्रोशीतील जनसामान्य प्रवासी जनतेत प्रचंड नाराजी असून या गाडीला सावदा रावेर येथे थांबा मिळणार असून फक्त निंभोरा येथे थांबा का नाही या रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी फर्मानामुळे जनतेच रोष आहे
यासंदर्भात निंभोरा येथील माझी जि प सदस्य सामाजिक कार्यकर्ते दुर्गादास भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी सोमवारी जाणार असून निंभोरा येथील थांबा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी निवेदन देणार आहे.
तरी स्वातंत्र्यपूर्व काळापासून निंभोरा येथे थांबत असलेल्या या एक्सप्रेस गाडीला थांबा पूर्ववत मिळावा व पंचक्रोशीतील प्रवासी जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
*दुर्गादास पाटील*
माजी जि .प. सदस्य
# निंभोरा येथे एक्सप्रेस थांबा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे ही मागणीचे निवेदन येऊन जाणार असून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल #
*धर्मराज मीना*
निंभोरा रेल्वे प्रबंधक
#प्राप्त माहितीनुसार दादर अमृतसर ही गाडी नेहमीप्रमाणे धावत नसून ती १६ जून पासून विशेष गाडी म्हणून सुरू B थांबे एक कमी करण्यात आले आहे#

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button