Paranda

?️ हाता तोंडाला आलेला घास पुन्हा हिरावला,वादळी वाऱ्या सह अवकाळी पावसाचा कहर केळी,द्राक्षे बागा जमीनदोस्त..लाखोचे नुकसान

वादळी वाऱ्या सह अवकाळी पावसाचा कहर केळी , द्राक्षे बागा जमीनदोस्त लाखोचे नुकसान

हाता तोंडाला आलेला घास पुन्हा हिरावला , पंचनामा करण्याची मागणी ,

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.१४

कधी दुष्काळ तर कधी आवकाळी चा तडाखा शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही मोठया कष्टाने लागवड करून जोपसलेले केळी , द्राक्षे , अंबा , पपई च्या बागा दि .१३ एप्रील रोजी झालेल्या चक्रीवादळा सह अवकाळी पावसाने भुई सपाट होऊन लाखो रुपयाचे चे नुकसान झाले आहे प्रशासणाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी होत आहे .

परंडा तालूक्यातील दुष्काळी परिस्थीती वर मात करीत दुधी ता परंडा येथिल शेतकरी शंकर जाधव यांनी केळी २ हेक्टर , व १ हेक्टर अंब्याची फळबाग लागवड करून आज पर्यंत मोठया कष्टाने जोपासले आहे या वर्षी अंब्याला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती ईतके वर्ष केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना दि १३ रोजी दुपारी अचानक चक्रीवादळ सुरू होऊन मेघगर्जना सह अवकाळी पावसाने थैमान घातले या मध्ये हाता तोंडाला आलेले केळीचे पिक पुर्ण भुई सपाट झाले तर आंबे गळून पडले .

राक्षसी वादळा मुळे फळबागेचे नुकसान डोळ्या समोर होत होते मात्र शेतकरी काहीच करू शकत नव्हता हतबल होऊन डोळ्यात आश्रृ येत होते , कष्टाचे फळ मिळेल याची आशा आता संपली होती ,

काही शेतकऱ्यांनी विमा भरला आहे मात्र नुकसानच्या प्रमाणा नुसार भरपाई मिळेल का असा मोठा प्रश्न आहे , सरकारने पंचनामे करून तालूक्यातील नुकसान झालेल्या फळबागेचे पंचनामे करून आर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button