Amalner

तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीक विमा रक्कम मंजूर करावी..गडखांब येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन….

तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीक विमा रक्कम मंजूर करावी..गडखांब येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन….

अमळनेर माननीय उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी अमळनेर विभाग अमळनेर यांना गडखांब ग्रुप ग्रामपंचायत मार्फत खालीलप्रमाणे निवेदन देण्यात आले गडखांब ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गडखांब कचरे धुपी मांजरडी हे गाव येतात हे गाव पातोंडा वनगाव मंडळात येतात सदर मंडळात यावर्षी अगदी तुटपुंजा पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा पिकांची लावणी व पेरणी केलेली असून पिकांची उगवण झालेली नाही व ज्यांची उगवण झालेली आहे ते आता पाण्याअभावी जळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झालेली आहे शेत विहिरींना पाणी नाही गावात पिण्यासाठी पाणी नाही गुरांसाठी पाणी व चारा नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे हाच पैसा शेतात टाकला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे शासनाने विनाविलंब दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची रक्कम पोटी हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत मिळणेसाठी सदर निवेदन देण्यात आलेले आहे महाशय उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी अमळनेर यांनी आमच्या भावना महाशय जिल्हाधिकारी जळगाव व शासनाकडे मांडून आमच्या गावातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा व शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मिळावा व विज बिल माफ करण्यात यावे अशी विनंती या निवेदनात केलेली आहे.

सदर निवेदन सरपंच सुरेश उत्तम पाटील सदस्य दीपक बिऱ्हाडे सामाजिक कार्यकर्ते रमेश व्यंकट पाटील आर डी बोरसे दिलीप गिरधर पाटील एकनाथ डॉन पाटील यांच्या सह्या असून निवेदन देताना ही सर्व मंडळी उपस्थित आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button