Kalyan

?Crime Diary Breaking… गुन्ह्यांचा मास्टर माईंड..100 च्या वर गुन्हे दाखल असलेला हैदर शेवटी पोलिसांच्या जाळ्यात..!

?Crime Diary Breaking… गुन्ह्यांचा मास्टर माईंड..100 च्या वर गुन्हे दाखल असलेला हैदर शेवटी पोलिसांच्या जाळ्यात..!

कल्याण चोरट्यांचा नेता असलेला एक अट्टल गुन्हेगार कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तहजीब इराणी असे ह्या नेत्याचे नाव आहे. त्याच्या टोळीतल्या एखाद्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या की तो आकाडतांडव करायचा. थेट पोलिसांवर हल्ला करायचा. अश्या 100 च्या वर गुन्हे असलेल्या या चोरांच्या नेत्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे.

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची मोठी कामगिरी

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकून येथील दादा किंवा भाई हैदर तहजीब इराणी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी हैदरवर जवळपास 100 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. इतकंच नव्हे तर पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा तो मास्टमाईंड होता. त्याच्यावर देशभरातून चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही दिवसांत पोलिसांवर अनेक हल्ले..

खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी योगेश गायकर आणि त्यांच्या पथकाने हैदरला पकडले आहे. गेल्या काही महिन्यात आतापर्यंत एकूण दहा ते बारा हल्ले पोलिसांवर झाल्याची माहिती आहे.या घटनांमध्ये कित्येकवेळा पोलीस देखील जखमी झाले आहेत.

कोण आहे हैदर ?

हैदरच्या विरोधात मोबाईल आणि चेन स्नैचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये फक्त कल्याण डोंबिवलीत 25 गुन्हे, मुंबईत 30 गुन्हे, राज्यभरात गुन्हे आणि महाराष्ट्राबाहेरील गुन्हे असे मिळून 100 हून जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली. इतकेच नाही तर 2 मार्च 2021 रोजी दुपारी कल्याणच्या इराणी वस्तीत वसई पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड हैदर होता. आरोपीला पळून घेऊन जाताना चेहरा सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसला होता. हैदर पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. चोरट्यांचा नेता, अशी त्याची ख्याती आहे. त्याला पकडल्याने पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतूक केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button