Kalyan

?Crime Dairy….खून करून भासवली आत्महत्या…चित्रपटात शोभेल अशी घटना घडली…पोलिसांनी सुगावा नसतांना पकडला आरोपी….

?Crime Dairy….खून करून भासवली आत्महत्या…चित्रपटात शोभेल अशी घटना घडली…पोलिसांनी सुगावा नसतांना पकडला आरोपी….

कल्याण पी व्ही आनंद

कल्याण येथे आपल्या प्रेयसीचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतीत संपूर्ण माहिती अशी की लग्नाला नकार देत असलेल्या आपल्याच प्रेयसीला विकृत प्रियकराने तिचा ओढणीच्या साहाय्याने झाडावर लटकवून तिचा खून करून आत्महत्या भासविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून तिला निर्जनस्थळी हा विकृत 31 वर्षीय तरुण घेऊन गेला आणि तिचा झाडाला गळफास देऊन तिचा खून केला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव या विकृत प्रियकराने रचला.

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात खुनी प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून डोंबिवली पश्चिम भागातून अटक करीत आरोपीला कोनगाव पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. दिपक जगन्नाथ रुपवते ( वय 31 रा. गोविंदवाडी, कल्याण पश्चिम ) असे या विकृत खुनी प्रियकराचे नाव आहे. तर पिडीत तरुणी ही चंदनशिव नगर वाडेघर गाव,कल्याण पश्चिम येथे राहणारी होती.

मृतक तरुणी आणि आरोपी दीपक यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपी दीपक हा व्यवसायाने रिक्षाचालक असून त्याने मृत किरणकडे लग्न कर असा हट्ट धरला होता. मात्र, किरण त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने प्रेयसी किरणचा काटा काढण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तिला कल्याणमधून बहाण्याने रिक्षात बसून भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डिंगचे मागे असलेल्या झाडाझुडपात नेऊन तिचा खून केला.

दरम्यान, मृतक तरुणीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे . त्यांनतर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नुसार आरोपी डोंबिवली पश्चिम भागात फिरत आहे त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी तात्काळ स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवा.दत्ताराम भोसले यांना बातमीची शहानिशा करून पुढील कारवाईसाठी कोनगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कसून चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी किरण ही लग्नाला नकार देत असल्या कारणामुळे तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.कुठलाही सुगावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण पोलिसांचे वरिष्ठाकडून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button