Pandharpur

जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने क्रेडाई पंढरपूर व लायन्स क्लब पंढरपूर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने क्रेडाई पंढरपूर व लायन्स क्लब पंढरपूर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर उपनगरांमधील इसबावी भागात रिया हॉटेल च्या पाठीमागे मोठ्या ओपनस्पेस मध्ये लायन्स क्लब पंढरपूर, क्रेडाई पंढरपूर
यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले जवळपास ५० झाडे सदरप्रसंगी लावण्यात आली. सदर भागातील महिला भगिनी व बंधू ,लायन्स,क्रेडाई वुमन विंग सदस्य आवर्जून उपस्थित राहिले, स्वतः पुढे येउन झाडे लावण्यासाठी श्रमदान केले व या झाडांची आम्ही नियमीत काळजी घेऊ पाणी देउ व झाडे जगवु असे सांगितले आणि झाडाच्या सुरक्षिततेसाठी ट्रि गार्ड उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली. लवकरच लायन्स संस्था व क्रिडाई संस्थे मार्फत ट्रिगार्ड उपलब्ध करुन आम्ही देउ असे क्रेडाई अध्यक्ष मुकुंद कर्वे व विवेक परदेशी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास लायन्स अध्यक्ष क्रेडाई पंढरपूर चे पि.आर.ओ. विवेक परदेशी, लायन्स व क्रेडाई सदस्य शार्दुल नलबीलवार, लायन्स सचीवा ललीता कोळवले जाधव, मा.नगरसेवक सनी मुजावर, क्रेडाई वुमन्स विंग व लायन्स सदस्य ला.सीमा नलबीलवार,शर्मीला देशपांडे, ला.सारिका यलमार, श्री व सौ.थीटे, सौ. बाबर, सौ. सलगर, सौ. ढमे, सौ. गायकवाड,सौ.अधटराव,सौ.पाटील, सौ.यलमार, सौ.मुजावर, सौ.वाघमारे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button