Nashik

अल्फ इंजिनियरींग प्रा लिमिटेड च्या सौजन्याने नाशिक औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी कोवीङ विलगीकरण कक्ष कार्यरत..

अल्फ इंजिनियरींग प्रा लिमिटेड च्या सौजन्याने नाशिक औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी कोवीङ विलगीकरण कक्ष कार्यरत..
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : नाशिक औद्योगिक वसाहतीतील सर्व कामगार यांच्या साठी अबंङ एम आय ङी सी मधील अल्फ इंजिनियरींग प्रा लिमिटेड च्या सौजन्याने नाशिक अबंङ सातपुर जिल्ह्यातील कामगार व त्याच्या परिवार यांच्या साठी कोवीङ विलगीकरण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे सातपुर खुटवङनगर
आपल्या सिटू भवन येथील विलगीकरण कक्ष ( corentine center) रविवार दि ८मे २०२१ पासून सुरू होत आहे या विलगीकरण कक्षात आपल्या सभासद व त्यांचे आई-वडील पत्नी किंवा मुले तसेच युनियन सभासदांना व्यतिरिक्त व्यवस्थापनातील अधिकारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक यांना देखील या विलगीकरण कक्षा मध्ये प्रवेश दिला जाईल
कॉम्रेड आपण राहात असलेल्या कुटुंबात एखादा व्यक्ती पॉझिटिव झाल्यास त्यास वेगळे राहणे गरजेचे असते. मात्र वन रूम किचन किंवा टू रूम किचन यामध्ये राहताना आपले नातेवाईक, मुले ,आई-वडील हे देखील पॉझिटिव्ह होण्याची शक्यता असल्याने नाशिक जिल्हा सिटूने आपल्या कामगार कष्टकऱ्यांसाठी तसेच आपले सहानुभूतीदार यांचेसाठी सिटू भवन मध्ये विलीनीकरण कक्ष तयार केला आहे.
तरी आपण या विलगीकरण कक्षात राहून आपण स्वतः व आपल्या कुटुंबातला या आजारापासून वाचवावे.
या महामारी मुळे आपण आपले जवळचे नातेवाईक मित्र यांना गमावलेले असल्याने यापुढे असे होऊ नये म्हणून आपण सर्वांनी हा आजार न लपवता कोरोनाची लागण झाली याची मनात भीती न ठेवता योग्यरीत्या वेगळे राहण्यासाठी विलगीकरण कक्षामध्ये येऊन आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवावे.
याबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक वर्कर्स युनियन सीटूचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी व त्वरित विलगीकरण कक्षामध्ये रहावे.असे आवाहन सीटु चे
कॉ.डॉक्टर डी एल कराड साहेब
कॉ. सिताराम ठोंबरे
काँ.तानाजी आप्पा जायभावे
कॉ. दिनेश सातभाई
कॉ. संतोष काकडे
कॉ. तुकाराम सोनजे
कॉ. सतीश खैरनार
कॉ.ऍड. भूषण सातळे
कॉ.आत्माराम डावरे
कॉ.अरविंद शहापुरे
कॉ. मोहन जाधव. आदीने केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button