Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये १५ वर्षा पुढील विद्यार्थ्यांची कोव्हिड १९ लसीकरण मोहिम यशस्वी संपन्न

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये १५ वर्षा पुढील विद्यार्थ्यांची कोव्हिड १९ लसीकरण मोहिम यशस्वी संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला :येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये कोव्हिड १९ प्रतिबंध करण्याकरिता १५ वर्ष वयापुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वी संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. कोळी साहेब,व त्यांचे सहकारी,यांचा सत्कार संस्थेचे डायरेक्टर श्री दिनेश रुपनर यांनी केला. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, लसीकरण मोहिमेचे समन्वयक प्रा.अनिल वाघमोडे व इतर प्राध्यापक आदी उपस्थित होते. या अनुषंगाने लस घेण्याकरिता पात्र असलेल्या परंतु अद्याप कोव्हिड १९ लस न घेतलेल्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या मोहिमेचा लाभ घेतला.या मोहमेअंतर्गत एकूण जणांचे ४७ जणांचे लसीकरण करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button