India

Covid 19: आता ओमियोक्रोन चा लहान बंधू दाखल..!”हा” नवा विषाणू ठरू शकतो घातक..!

Covid 19: आता ओमियोक्रोन चा लहान बंधू दाखल..!हा नवा विषाणू ठरतोय डोकेदुखी..!

गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करतोय. अशातच आता अजून एक चिंतेची बाब म्हणजे कोरोनचा नवा व्हायरस समोर आला आहे. चीनमधील वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, एका नवीन कोरोना विषाणू ‘NeoCov’ने समोर आला आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, नवीन कोरोना व्हायरस खूप संसर्गजन्य आहे आणि 3 पैकी 1 संक्रमित रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हा नवा कोरोना दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. दरम्यान हा नवा कोरोना विषाणू अजून मानवांमध्ये पसरलेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

हा निओकोव्ह कोरोना व्हायरस मर्स कोव्ह व्हायरसशी संबंधित आहे. 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याचा प्रभाव पहिल्यांदा दिसून आला होता. दक्षिण आफ्रिकेत, हा निओकोव्ह विषाणू वटवाघुळांमध्ये दिसलाय आहे आणि तो केवळ प्राण्यांमध्ये पहायला मिळालाय.

NeoCoV आणि त्याच्या जवळील PDF-2180-CoV माणसांना संक्रमित करू शकतात. मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी या नवीन कोरोना व्हायरसला फक्त एक म्युटेशनची गरज आहे. संशोधनात असं म्हटलंय की, NeoCoV व्हायरसमुळे MERS प्रमाणेच अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हा आकडा दर 3 रुग्णांपैकी 1 असू शकतो.
रशियाच्या सरकारी व्हायरोलॉजी रिसर्च सेंटरने गुरुवारी एक निवेदन जारी केलंय. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या हा व्हायरस माणसांना संक्रमित करण्यास सक्षम नाही. मात्र याचा धोका लक्षात घेता, अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button