Karnatak

गटशिक्षणाधिकारी नसल्याने क्षेत्रात शिक्षकांचे दरबार

गटशिक्षणाधिकारी नसल्याने क्षेत्रात शिक्षकांचे दरबार

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : सरकारच्या दुर्लक्षामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालय खाली ? हुलसूर गटशिक्षणाधिकारी कार्यालय खाली ?
प्रभारी क्षेत्र गटशिक्षणाधिकारी झालेले कार्यालय नावापुरतेच राहिले आहे फक्त राष्ट्रीय सणाला म्हणजे ध्वजारोहणालाच येतात त्यानंतर कार्यालयात कुत्रे बसलेले दिसून येतात तालुका विविध शाळा क्षेत्र शिक्षण अधिकारी भेट नदिल्याने शिक्षकांचा शाळेला वेळेवर येत नसल्याचे दिसून येत आहे व तसेच हुलसूर तालुका झाल्याचे दिसते २०१९ रोजी राज्य कर्नाटक सरकार ४३ तालुके घोषित केले आहे पण सार्वजनिकांना मिळनारे सवलत नागरिकांना कामासाठी जुन्या व नवीन तालुक्यात फिरत आहेत काही काम जुन्या कार्यालयात तर नवीन कार्यालयात फिरती सुरू आहे.
२०१९ रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय हुलसूर येथे प्रारंभ करून तालुक्यातील नागरिकांना आदेश दिले होते नारायणपूर शाळेतील मुख्याध्यापक संजुकुमार कांगे हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व रवींद्र बिरादार यांना बि.आर.सी.पदभार दिले होते त्यामुळे हुलसूर क्षेत्र शिक्षण अधिकारी संजुकुमार कांगे बसवकल्याण बी.ओ. कार्यालयात सेवा करीत आहेत बी.आर.सी रवींद्र बिरादार आता मुचळंब शाळेत मुख्याध्यापक म्हणून पाठविले आहे त्यामुळे नावापुरतेच कार्यालय झाले आहे दुपारी मात्र कार्यालयात कुत्रे दिसत आहेत.
गटशिक्षणाधिकारी नसल्याने क्षेत्रात शिक्षकांचे दरबार भरले आहे हुलसूर तालुक्यात सुमारे अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व हायस्कूल आहेत त्यामध्ये शिक्षक सेवा करीत आहेत बसवकल्याण शिक्षण अधिकारी विविध शाळेला भेट नदिल्याने शिक्षक केव्हा ही यावे व केव्हा ही जावे असे झाले आहे हे सर्व सार्वजनिक नागरिक बोलत आहेत.
विवेकानंद चाळकापुरे कर्नाटक रक्षणा वेदिके तालुका घटक अध्यक्ष – सरकार गटशिक्षणाधिकारी कार्यालय नावालाच झाले आहे त्यामुळे कार्यालयात कुत्रेच दिसत होते त्यामुळे शिक्षक हे वेळ न देता येत आहेत हे सर्व परिणाम विद्यार्थाच्या शिक्षणावर होत आहे.
संजुकुमार कांगे गटशिक्षणाधिकारी – प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे वरील अधिकारी आदेश दिल्या प्रमाने काम करीत आहोत मला संपूर्ण अधिकार दिले नाहीत त्यामुळे मला काहीच करता येत नाही असे बोलत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button