Yawal

यावल नगरपरिषदेतील भ्रष्टचाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी : यावल शहर शिवसेनेची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

यावल नगरपरिषदेतील भ्रष्टचाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी : यावल शहर शिवसेनेची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

यावल, (प्रतिनिधी ) येथील यावल नगरपरिषदेतील झालेल्या भ्रष्टचाराची एस.आय.टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावल शहर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, यावल नगर परिषदेत आज पर्यंत झालेल्या विविध विकासात्मक कामात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असुन झालेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा दाट संशय आहे. यावल शहरात तसेच न.पा विस्तारीत क्षेत्रात झालेल्या पाणी पुरवठाच्या पाईप लाईन कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असुन कामे निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच यावल शहराच्या पाणी पुरवठ्या अतिरिक्त पाणी साठवण तलावात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.सदर तलावाचे काम मंजुर नकाशा व एस्टीमेंट प्रमाणे झालेले नाह.तशेच मजूर क्षेत्रापेक्षा कामी क्षेत्रावर केलेले आहे. एस्टीमेंट नुसार डांबर पाचिंग केलेली नाही त्याच प्रमाणे तलावासाठी वापरण्यात आलेले रबर ताडपत्री निकृष्ट दर्जाचे आहे.तशेच मंजुर जागेवर तलावाचे काम केलेले नाही.हतनूर विभागाकडून मिळवलेल्या जागेवर सदर तलावाचे काम झालेले नाही.तसेच या कामात सुमारे १ कोटी ८० लाख रुपयंचा भ्रष्टाचार झालेचा संशय आहे. तसेच न.पा च्या झालेल्या संपुर्ण विविध कामे निकृष्ट दाचे झाले असुन न.पा.च्या सर्वच कामांची तातडीने एस.आय.टी मार्फत चोकशी करून कामांचे स्पेशल ऑडीट करण्यात यावेव संबधितांवर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button