Pandharpur

पंढरपूर नगरपालिके मध्ये भ्रष्टाचाराचा कहर…महिला व बालकल्याण योजनेत घपला,आम आदमी पार्टी सचिव नागेश पवार

पंढरपूर नगरपालिके मध्ये भ्रष्टाचाराचा कहर…महिला व बालकल्याण योजनेत घपला,आम आदमी पार्टी सचिव नागेश पवार

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपूर नगरपालिकेतील महिला व बालकल्यान योजने अंतर्गत शहरातील महिलांना Beauty Parlour,DTP,Tally या महिलांनसाठी असलेल्या प्रशिक्षणामध्ये महिलांसाठी असलेला निधी मध्ये भ्रष्टाचारा झाला असुन आता नगरपालिकेच्या कारभारी यांना महिलांच्या या फंडामध्ये गफला करावा का?या महिला व बाल कल्याणार्थ 2500000 लाखंची तरतुद केली आहे हे खरे आहे,पण प्रत्यक्षात खर्च 1735100,इतका वर्गीकरण नोंदवहीत नमुद आहे,पण कोठे खर्च केला ?कसा केला,किती महिलांनी अर्ज केले,अर्जदार महिलांचा अर्जवर सही दिसुन येत नाही,अर्ज वर बोगस सही दिसुन येत आहे,काही अर्जवर तर वेगवेगळ्या दोन सही दिसुन येत आहेत,तसेच किती अर्ज आले,किती अर्ज पात्र झाले,किती महिलांना प्रशिक्षण दिले,त्यांची BIOMETRIC हाजेरी पत्रक का ठेवले नाही?अर्जावर महिलांचा फोटो नाही,अर्जावर व मस्टरवरील सही विसंगत आहे, काही अर्ज पेन्शीलने लिहले आहेत,या सर्व बाबींचा अभ्यस व विचार करता, कोणतीही शासणाची नियमावली डावलली गेली असल्यास यामध्ये निश्चित भ्रष्टाचार झालेला असतो,आणि हा भ्रष्टाचार अधिकारी व संबंधीत लोकप्रतिनीधी मिळुन करतात,अतिशय खेदजनक प्रकार आहे,महिलांसाठी असलेल्या योजना महिलांन पर्यंत न पोहचविता बोगस अर्ज तयार करुन भ्रष्टाचार करणे पैसे खाने ,घपला करणे हे योग्य आहे का?आणि पंढरपुर शहरातील महिला हा प्रकार सहन करतील का?महिलां त्यांच्या हक्कांन पासुन डावलले जात आहे हे खुपच निंदनीय आहे,आणि सत्ताधारी लोक प्रतिनिधी तेरीबी चुप आणि मेरीबी चुप,म्हणजे महिलांची बाजु मांडणारा कोणच नाही,हा निंदनीय प्रकार म्हणजे एक प्रकारचा पंढरपूर मधील महिलांनवर होणारा अन्यायच आहे,आणि आता सर्वच महिला सत्ताधारी यांना पायऊतार केल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चितच,कायदा सांगतोय महिलांना 33%अरक्षण,या सर्व निंदनीय प्रकाराने महिला वर्ग नाराज झालेला असुन,महिलांचे खच्चिकरण व त्यांना मिळणारे सोई सुविधांपासुन जाणीव पुर्वक वंचीत ठेवले जात आहे,महिला ही आदिशक्ती असुन ती येणारे निवडणुकीत निश्चितच सत्ताधारी यांना धडा शिकविणारच.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button