Pandharpur

श्री. संत दामाजी साखर कारखान्यात चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांच्या हस्ते तीन लाख साखर पोत्यांचे पूजन

श्री. संत दामाजी साखर कारखान्यात चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांच्या हस्ते तीन लाख साखर पोत्यांचे पूजन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी साखर कारखान्यात तीन लाख साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे विद्यमान चेअरमन समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते व व्हाईस चेअरमन श्री अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी ज्येष्ठ संचालक बबनराव आवताडे यांचे प्रमुख उपस्थिती व संचालक मंडळ महिला भगिनी तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खेळणी वेळी वातावरणात पार पडले

(या कार्यक्रमात प्रथमच विशेष उपस्थिती चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांचे दोन्ही सुपुत्र विराज समाधान आवताडे व आर्य समाधान अवताडे)

शेतकऱ्यांचा व कामगारांचा कणा असलेल्या श्री संत दामाजी साखर कारखान्यात चेअरमन समाधान दादा आवताडे व सर्व संचालक मंडळ यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली अत्यंत काटकसरीने कारखान्याची वाटचाल सुरू असल्याचे पहावयास मिळाले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा व वायपट खर्च न करता चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांनी पुढच्या काळात एक आदर्श साखर कारखाना म्हणून मंगळवेढ्याचे श्री संत दामाजी साखर कारखान्याकडे बघितले जाईल असे सांगितले.
यावेळी शेतकरी, कामगार तसेच सभासद, वाहतूक चालक-मालक तसेच मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button