Amalner

नगरसेविकेने दिला रस्ता दुरुस्ती संदर्भात आंदोलनाचा इशारा…!

नगरसेविकेने दिला रस्ता दुरुस्ती संदर्भात आंदोलनाचा इशारा…!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे डोळे बंद प्रभाग क्र.९ मध्ये डॉ. अंजली चव्हाण ते स्टेट बँक पर्यत रस्त्या वर भुयारी गटार चे काम नुकतेच झाले आहे.सदर काम अतिशय निकृष्ट झाल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हेतुपुरस्कर सबधितांस पाठीशी घालत आहेत. सदर काम करताना पूर्वी जसा रस्ता होता तसा पुन्हा जैसे थे करून देणे क्रम प्राप्त आहे तरी देखील ठेकेदारास पाठीशी घालण्याचे काम संबधीत विभाग करीत असल्याचे आरोप प्रभागाचा नगरसेविका सौ.कल्पना चौधरी यांनी केला आहे. सदर रस्त्याची इतके हाल झाले आहेत की तो रस्ता आहे की नाला हेच कळत नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खचला किंवा खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्यचा महा पराक्रम विभागाचे कर्मचारी करीत आहे.
तात्काळ सदर रस्ता विभागाने नागरिकांना वापरण्या योग्य न केल्यास आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल असे नगरसेविका सौ.कल्पना चौधरी यांनी काळविलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button